घरताज्या घडामोडीवंचितची युती, पोटनिवडणुकीबाबत राष्ट्रवादीचे नेते घेणार ठाकरेंची भेट

वंचितची युती, पोटनिवडणुकीबाबत राष्ट्रवादीचे नेते घेणार ठाकरेंची भेट

Subscribe

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी नुकताच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीने युती केली. या युतीनंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उद्धव ठाकरे यांची आज भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी ही भेट होणार आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी नुकताच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीने युती केली. या युतीनंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उद्धव ठाकरे यांची आज भेट घेणार आहेत. या भेटीत वंचितसोबतच्या युतीबाबत आणि कसबा व पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीबाबत चर्चा करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. (NCP leaders will meet Uddhav Thackeray regarding alliance with vanchit and by elections of kasba and pimpri chinchwad)

उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी ही भेट होणार आहे. अजित पवार यांच्यासह चार नेते मातोश्रीवर बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तसेच, कसबा आणि चिंचवड या दोन जागांवर उमेदवार दिले जाणार की निवडणुक बिनविरोध होणार? हे या बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे.

- Advertisement -

“उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कोट्यातून कुणाला मित्रपक्ष म्हणून सोबत घ्यायचे, हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. राजकारणात मागच्या निवडणुकीत कुणी जागा पाडल्या याला काही अर्थ नसतो. राजकारणात येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आराखडे आखावे लागतात व राजकीय भूमिका मांडावी लागते. युती- आघाडी होते, त्यावेळी ‘मागचे झाले गेले गंगेला मिळाले’ असे समजून पुढे गेलो तरच योग्य गोष्टी घडतात”, असे अजित पवार यांनी सांगितले.

शिवाय, अजित पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितल्या प्रमाणे सरकार असताना मुंबई महापालिका एकत्र लढवण्यासंदर्भात सेना सकारात्मक होती. आगामी मुंबई महानगर पालिका एकत्र लढवण्यासंदर्भात चर्चा होणार? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ठाणेकरांच्या पुढच्या 2 पिढ्याही क्लस्टर पाहू शकत नाहीत, जितेंद्र आव्हाडांचा शिंदे सरकारला टोला

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -