घरमहाराष्ट्रशिंदे सरकारवर कामाख्या देवीचा कोप सरकार लवकरच गडगडणार, राष्ट्रवादी नेत्याचा दावा

शिंदे सरकारवर कामाख्या देवीचा कोप सरकार लवकरच गडगडणार, राष्ट्रवादी नेत्याचा दावा

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे 40 समर्थक आमदार, खासदार आज कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीत दाखल झाले आहेत. आपल्या कुटुंबियांसह कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत. शिंदे गटातील हे सर्व आमदार खासदार गुवाहाटी विमानतळावर दाखल होताच त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. मात्र विरोधकांकडून त्यांच्या गुवाहाटी दौऱ्यावर मोठ्याप्रमाणात टीका होतेय. अशात शिंदे सरकारवर कामाख्या देवीचा कोप असल्याने हे सरकार लवकरच गडगडणार असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

विशेष विमानाने आमदार आणि खासदार गुवाहाटीला जात आहेत. एकूण 180 जण विमानात आहेत. हे सर्व जण आज दुपारी ते देवीचे दर्शन घेतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीतील कामाख्या देवीच्या दर्शनासाठी त्यांच्या सहकारी आमदारांना घेऊन गेले आहेत त्यावर महेश तपासे यांनी जोरदार टीका केली आहे. २९ नोव्हेंबरला सत्तांतर वादावर सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार असून या निकालानंतर १६ आमदारांचे निलंबन होणार आहे आणि त्यात स्वतः एकनाथ शिंदे आहेत त्यामुळे निलंबन झाल्या – झाल्या शिंदेसरकार गडगडणार आहे असेही महेश तपासे म्हणाले.

- Advertisement -

शिंदेसरकारकडून बळीराजाला ताकद देण्याचे काम झालेले नाही. शिवाय तरुणांना रोजगार मिळणारे राज्यातील प्रकल्प गुजरातला गेले तरीसुद्धा तरुणांच्या बाजुची भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली नाही उलट गुजरातला सहकार्य केल्याचे समोर आले आहे त्यामुळेच यंदा कामाख्या देवीचा आशिर्वाद नाही तर कोपाला सामोरे जावे लागणार आहे असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.

सहा महिन्यांपूर्वी 50 आमदारांसह एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले होते. त्या वेळी एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावे, असा नवस कामाख्या देवीला केला होता. हा नवस पूर्ण झाल्याने तो फेडण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह गुवाहाटीत पोहचले आहेत.


राज्यपाल कोश्यारी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; 26/11 मुंबई हल्ल्यातील शहिदांना चप्पल घालून केले अभिवादन

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -