धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखांनी धार्मिक सोहळ्याला जाणं टाळावं – माजिद मेमन

अयोध्येत (Ayoddhya) ५ ऑगस्ट रोजी राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असून या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी मराठी वृत्तवाहिनीला माहिती दिली आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याला जाण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार माजी माजिद मेमन यांनी आक्षेप घेतला आहे. धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखांनी धार्मिक सोहळ्याला जाणं टाळावं, असं मेमन यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. यामुळेम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत मतभिन्नता असल्याचं समोर आलं आहे. यापूर्वी याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकार टीका केली होती.

नक्की काय म्हणाले माजिद मेमन?

उद्धव ठाकरे हे राम मंदिराच्या भूमिपूजनसाठी देण्यात आलेल्या निमंत्रितांपैकी एक आहेत. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे कोरोनाच्या नियमांचं पालन करत सहभाग होऊ शकतात. पण धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखांनी अशा प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांना प्रसिद्धी देण्यापासून दूर राहावं, असं राष्ट्रावादी काँग्रेसचे माजी खासदार माजिद मेमन म्हणाले.

त्यामुळे ते आताही अयोध्येला जाणार – संजय राऊत

‘शिवसेनेचं अयोध्येशी एक भावनिक, धार्मिक आणि राजकीय नातं आहे. आजच्या राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यातले अडथळे दूर करण्यात शिवसेनेनं मोठं योगदान दिलं आहे. मुख्यमंत्री होण्याआधी आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) अयोध्येला गेले होते. त्यामुळे ते आताही अयोध्येला जाणार’, असं संजय राऊत म्हणाले आहेत.


हेही वाचा – उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार, कारण… – संजय राऊत