घरताज्या घडामोडीAjit Pawar : राष्ट्रवादीने रायगड मेळाव्यात घेतलेले ठराव भाजप-महायुती सरकारला मान्य होतील...

Ajit Pawar : राष्ट्रवादीने रायगड मेळाव्यात घेतलेले ठराव भाजप-महायुती सरकारला मान्य होतील का?

Subscribe

रायगड – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगड दौऱ्यावर आहेत.
येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत अल्पसंख्याक विश्वास मेळावा झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी काही ठराव संमत केले. या ठरावांची माहिती भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतील सहकारी शिंदेंची शिवसेना यांना सरकार म्हणून त्यासंबंधी निर्णय घ्यावे लागले तर ते त्याबद्दल सकारात्मक निर्णय घेतील का? असा प्रश्न पडावा असे ठराव अजित पवार यांच्या उपस्थितीत रायगडमध्ये घेण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विश्वास मेळाव्यात अजित पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. त्यासोबतच अल्पसंख्याकांना विशेष आरक्षणाची मागणी करण्यात आली. जातीनिहाय जनगणनेची मागणी करणारा ठराव या मेळाव्यात घेण्यात आला. जातीनिहाय जनगणनेच्या संदर्भात भाजपची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात घेण्यात आलेले ठराव हे आगामी काळात भाजप आणि महायुती सरकारला अडचणीचे ठरु शकणार आहेत.

- Advertisement -

काय-काय ठराव घेण्यात आले

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, सय्यद जलालुद्दी, बाबाजानी दुर्राणी, बाबा सिद्दीकी, नजीब मुल्ला, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे राज्य प्रमुख इद्रिस नायकवडी यांच्या उपस्थित झालेल्या मेळाव्यासाठी अजित पवार उपस्थित होते.

- Advertisement -
 • या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्हा अजित पवार गटाला मिळाल्याबद्दल अजित पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.
 • अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना अब्दुल कलाम शिष्यवृत्तीची रक्कम एक हजार कोटी केल्याबद्दल अजित पवारांचे अभिनंदन करण्यात आले.
 • महिला बचतगटांना कर्ज घेतना तारण ठेवण्याची अट काढून टाकण्यात आली आहे, यासाठी अजित पवारांचे मेळाव्यात अभिनंदन करण्यात आले.
 • अल्पसंख्याक समाजाला विशेष आरक्षणाची मागणी करणारा ठराव घेण्यात आला.
  अल्पसंख्याकांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षणाची मागणी ठरावाद्वारे करण्यात आली आहे.
 • दुसरा महत्त्वाचा ठराव आहे जातीनिहाय जनगणना करण्याचा. जातीनिहाय जनगणनेची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी अनेक महिन्यांपासून करत आहेत. भाजप मात्र त्याला प्रतिसाद देताना दिसत नाही. अशावेळेस महायुती सरकारमध्ये राहून राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या या ठरावाला भाजप आणि शिवसेनेचा पाठिंबा मिळेल का? असा सवाल उपस्थित होत आहे.
 • अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी बार्टी आणि मागासवर्गासाठी सारथीची स्थापन करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मार्टीची स्थापना करण्याची मागणीचा ठरवा मेळाव्यात संमत करण्यात आला. या माध्यमातून अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाईल. महिलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागणार नाही.
 • महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र वसतीगृहांची व्यवस्था करण्यात यावी.
 • कबरस्थान आणि ईदगाहच्या जमीनींवर अतिक्रमण होऊ नये यासाठी त्याभोवती संरक्षण भिंत महाराष्ट्र सरकारने बांधून द्यावी, असा एक ठराव अजित पवारांच्या उपस्थितीत संमत करण्यात आला.
 • उर्दू शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असून यामुळे विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. त्यासाठी उर्दू शाळांमध्ये शिक्षक भरती त्वरीत करण्यात यावी या संबंधीचा ठरवा करण्यात आला.
  भाजप नेते आणि अनेक आमदार हे उर्दू भाषेबद्दल द्वेषाने बोलत असता. त्यामुळे यासंबंधीचा ठराव मंत्रिमंडळ बैठकीत आल्यास भाजप आणि शिवसेनेचे नेते त्याला पाठिंबा देऊन मंजूर करणार का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार सर्व समाजामध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नाला त्यांचे सत्तेतील मित्रपक्ष आता कशा पद्धतीने सहकार्य करतात हे पाहाणे महत्त्वाचे राहाणार आहे.

हेही वाचा : Riteish Deshmukh : काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत भाऊ अमित देशमुखांबद्दल रितेश यांनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -