घरताज्या घडामोडीराष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंना मंत्रिपद? पाहा संभाव्य मंत्र्यांची यादी

राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंना मंत्रिपद? पाहा संभाव्य मंत्र्यांची यादी

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आदिती तटकरे यांच्या गळात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आदिती तटकरे या सुनील तटकरे यांच्या कन्या असून पहिल्यांदाच आमदार म्हणून त्या निवडून आलेल्या आहेत. राष्ट्रवादी युवती संघटनेच्या माध्यमातून त्यांनी पक्षसंघटनेत काम केलेले आहे. तर २०१७ पासून त्यांनी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन महिला आमदार निवडून आलेल्या आहेत. त्यापैकी आदिती तटकरेंना मंत्रिपद मिळणार असल्याचे बोलले जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघात वैभव पिचड यांचा पराभव करुन राष्ट्रवादीचे जायंट किलर ठरलेले डॉ. किरण लहामटे यांना देखील मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे.

कोण आहेत आदिती तटकरे?

आदिती तटकरे यांनी २००८-०९ मध्ये रायगड जिल्ह्यात स्थानिक राजकारणात एंट्री घेतली. २००९ साली सुनील तटकरे यांच्यासाठी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचारात सक्रीय सहभाग घेतला होता. २०१२ पासून राष्ट्रवादी युवती काँग्रेसमध्ये संघटनात्मक कार्याला सुरुवात केली. २०१७ साली त्या रोहा तालुक्यातून रायगड जिल्हा परिषदेवर निवडून गेल्या. त्यानंतर त्यांची जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्या पहिल्यांदाच आमदार म्हणून विधानसभेत आल्या.

- Advertisement -

हे आहेत राष्ट्रवादीचे संभाव्य मंत्री

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अजित पवार, दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब पाटील, दत्ता भरणे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, राजेश टोपे, डॉ. राजेंद्र शिंगणे, आदिती तटकरे आणि डॉ. किरण लहामटे यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -