घर ताज्या घडामोडी नवीन संसद भवन उद्धाटन : मिटकरींची PM मोदींवर टीका; म्हणाले, 'देशात लोकशाही...

नवीन संसद भवन उद्धाटन : मिटकरींची PM मोदींवर टीका; म्हणाले, ‘देशात लोकशाही अस्त…’

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतल नवे संसद भवन विरोधी पक्षांच्या टीकेच्या केंद्रस्थानी आहे. वादग्रस्त ठरलेल्या या नव्या संसद भवनाचे आज (28 मे) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धाटन केले. या ऐतिहासिक सोहळ्यावर देशातील 21 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे.

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतल नवे संसद भवन विरोधी पक्षांच्या टीकेच्या केंद्रस्थानी आहे. वादग्रस्त ठरलेल्या या नव्या संसद भवनाचे आज (28 मे) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धाटन केले. या ऐतिहासिक सोहळ्यावर देशातील 21 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. अशातच देशाची वाटचाल अधोगतीकडे जात असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. (NCP MLA Amol Mitkari criticized Prime Minister Narendra Modi over the inauguration of the new Parliament building)

नव्या संसद भवनाचे उद्धाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधूसंतासोबतचा काढलेल्या फोटो सोशल मीडियावर शेअर केला. पंतप्रधान मोदींनी शेअर केलेला हा फोटो आणि देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळाचा फोटो एकत्रित करत अमोल मिटकरी यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच, त्याला “ये कहाँ आ गए हम 1947-2023” असे कॅप्शन दिले आहे.

- Advertisement -

अमोल मिटकरी यांचे ट्वीट

हा फोटो शेअर करत अमोल मिटकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. “देशात लोकशाही अस्त… सम्राट अशोक कालीन परंपरा खोडून काढत संविधान मोडीत काढण्याचा अफलातून प्रयोग. राष्ट्रपतीऐवजी महाराज लोकांना सन्मान, लोकशाहीच्या पवित्र स्थळी आज कर्मकांड ब्लॅक डे”, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली.

- Advertisement -

शरद पवारांची पंतप्रधानांवर नाराजी

दरम्यान, या ऐतिहासिक सोहळ्यावर देशातील 21 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. या कार्यक्रमातून लोकशाहीचे प्रमुख असलेले राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांना आमंत्रित न करण्यात आल्याने विरोधकांनी आजच्या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला. पण आजच्या या कार्यक्रमावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संसद भवन निर्मितीचा निर्णय घेताना आम्हाला विचारात घेण्यात आले नाही. देशात जे काही सुरू आहे, ते लोकशाही विरोधी आहे, असे मत शरद पवारांनी व्यक्त केले आहे.

”ज्या लोकांची तिथं उपस्थित होती, जे काही धर्मकांड काम सुरू होती, ते पाहिल्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक भारताची जी संकल्पना मांडली होती, ते पाहता जे आता पार्लमेंटमध्ये चाललंय यात जमीन अस्मानाचं अंतर आहे. पुन्हा एकदा आपण देशाला काही वर्ष पाठी नेतो की काय अशी चिंता वाटू लागली आहे. विज्ञानाशी तडजोड करता येत नाही. नेहरूंनी आधुनिक विज्ञानावर आधारीत समाज तयार करण्याची भूमिका सतत मांडली. आज त्या ठिकाणी जे चाललं ते नेमकं उलटं चाललं आहे”, असेही शरद पवार म्हणाले.


हेही वाचा – नवीन संसदेचे उद्घाटन : PM मोदींनी गांधींना नमन करुन केली हवन पूजा, सेंगोलला साष्टांग दंडवत करत केले स्थापित

- Advertisment -