Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र मोदी-ठाकरे भेटीनंतर चंद्रकांत पाटील-फडणवीस शकुनी डाव टाकतील - राष्ट्रवादी

मोदी-ठाकरे भेटीनंतर चंद्रकांत पाटील-फडणवीस शकुनी डाव टाकतील – राष्ट्रवादी

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात गेल्या तासाभरापासून बैठ सुरू आहे. मराठा आरक्षण संदर्भात ही बैठक सुरू आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे देखील बैठकीत उपस्थित आहेत. या भेटीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

- Advertisement -

अमोल मिटकरी यांनी ट्विट करत चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांचा जीव निश्चितच आज टांगणीला लागला असेल. आम्हाला विश्वास आहे देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या अडचणी समजुन घेतील. मात्र कमालीची अस्वस्थ झालेली ही जोडी सकारात्मक चर्चेनंतरही सारिपाठाचा ‘शकुनी’ डाव टाकल्या शिवाय राहणार नाही,” असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

- Advertisement -

तसंच, अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. “अजुन बैठकीला सुरुवात पण झाली नाही आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण जी दरेकर महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकार वर बोलायला लागले. अर्थ स्पष्ट आहे भाजप मानसिक दृष्ट्या थकलेला पक्ष झालाय. बडबड आणि वायफळ विधाने यापेक्षा दुसर त्यांच्याकडे काही शिल्लक नाही,” असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं.

 

- Advertisement -