उगाच तोंड उघडायला लावू नका; मिटकरींचा केसरकरांना इशारा

ncp mla amol mitkari slams deepak kesarkar on tweeter for sharad pawar controversial statement

जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा हात होता, दिवंगत शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना शरद पवार यांनी त्यांना किती यातना दिल्यात हे महाराष्ट्रातील जनतेला सांगाव्या असं वादग्रस्त विधान शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले, या विधानाला आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र विरोध होताना दिसतोय, दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या केसकरांच्या वादग्रस्त विधानावर चांगलेच प्रत्युत्तर दिले होते. ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात, असा परखड सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारला होता. यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील केसरकरांना धमकी वजा इशारा दिला आहे. मिटकरांनी ट्विट करत केसरकरांवर टीका केली आहे.

त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, केसरकर साहेब सद्या तुम्ही हवेत आहात. पवार साहेबांवर बोलल्याने प्रसिध्दी मिळते हे तुम्ही जाणुन आहात. तुमची अजितदादांसमोर असणारी केविलवाणी अवस्था मी अनेकदा पहिली आहे. उगाच आम्हाला तोंड उघडायला लावू नका. हवेतून खाली या. तसेही तुमची बडबड जास्त दिवस चालणार नाही. दरम्यान दीपक केसरकरांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवरून आता अनेक राजकीय नेत्यांनी आगपाखड केली आहे.

हेही वाचा : राणेंच्या मुलांना कोकणी माणसाने यापूर्वीच लायकी दाखवली; केसरकरांकडून निलेश राणेंना प्रत्युत्तर

केसकरांनी शरद पवारांवर केलेली नेमकी टीका काय ?

केंद्रीय नेते नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यास मी मदत केली असली तरी, त्यांना कोणत्या पक्षात जावे ही अट मी घातलेली नव्हती, असे खुद्द शरर पवार यांनीच मला सांगितले होते. असा दावा केसरकरांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना ते स्वत: बाहेर घेऊन गेले होते. राज ठाकरे यांच्याबाबतीतही तेच झाले. राज ठाकरे यांना शरद पवारांचे आशीर्वाद होतेच. राज ठाकरेही त्यांना मानतात. इतर फुटीच्या वेळीही त्यावेळचे काँग्रेसचे नेते म्हणून ते होतेच, असा आरोप केसरकर यांनी केला होता.

जितेंद्र आव्हाड यांचेही ट्विटवरून प्रत्युत्तर 

दरम्यान केसरकरांच्या या आरोपांवर जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून प्रतिउत्तर दिले आहे. अहो केसरकर किती बोलता पवारसाहेबांविरुद्ध? एकेकाळी साहेबांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले. ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात? २०१४ ला मीच आलो होतो साहेबांचा निरोप घेऊन जिथे आहात तिथे सुखी राहा, खाजवून खरूज काढू नका. असं ट्विट आव्हाडांनी केलं आहे.


हेही वाचा :  द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देऊन शिवसेना वाचणार?