Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला

राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला

Subscribe

मुंबई : बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला या महिन्याच्या सुरुवातीला परळीत भीषण अपघात झाला होता. त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 16 दिवसांच्या उपचारानंतर गुरुवारी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांना पुढील काही दिवस सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

परळीत आपल्या गाडीला अपघात झाल्याची माहिती खुद्द धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावरून दिली होती. मंगळवारी (3 जानेवारी 2023) दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतत असताना, रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास परळी शहरातील आझाद चौकात माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, अशी माहिती धनजंय मुंडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली होती. अपघातानंतर त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- Advertisement -

छातीला जखमा असल्याने आमदार धनंजय मुंडे यांना दुसऱ्या दिवशी (4 जानेवारी 2023) उपचारासाठी एअर अँब्युलन्सने मुंबईत आणण्यात आले आणि ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती.

- Advertisement -

पुढील काही दिवस डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्याने मुंबईतील निवासस्थानी काही दिवस विश्रांती घेऊन परळी येथे लवकरच सर्वांना भेटून पुन्हा जनसेवेत दाखल होणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

पंकजा मुंडेंनी घेतली होती भेट
धनंजय मुंडेंच्या भगिनी व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी धनजंय मुंडेंची भेट घेतली. यावेळी पंकजा मुंडे यांनी बहिणीचे नातं समोर ठेवत काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. तसेच, “धनंजय फार दगदग करू नकोस, तब्येतीची काळजी घे”, असा सल्लाही पंकजा मुंडे यांनी दिला. 11 जानेवारी 2023, (बुधवार) रोजी संध्याकाळी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची ब्रीच कॅण्डी रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती.

- Advertisment -