घरमहाराष्ट्रNCP MLA Disqualification : शरद पवार गटाला धक्का; राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच-...

NCP MLA Disqualification : शरद पवार गटाला धक्का; राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच- नार्वेकर

Subscribe

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाच्या वाचणास अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 4 वाजून 50 मिनिटाला सुरुवात केली. निकाल वाचन त्यांनी इंग्रजीतूनच केला.

मुंबई : राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकाल वाचणास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून सुरुवात झाली आहे. दोन्ही गटाकडून दाखल करण्यात आलेल्या एकूण नऊ याचिकांवर अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देत आहेत. अजित पवार यांच्याकडे 41 आमदारांचे पाठबळ आहे. विधिमंडळ पक्षामध्ये बहुमत हा एकमेव निकष असतो असं सुरुवातीच्या वाचनामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे. (NCP MLA Disqualification : NCP belongs to Ajit Pawar!- Rahul Narvekar)

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाच्या वाचनास अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 4 वाजून 50 मिनिटाला सुरुवात केली. निकाल वाचन त्यांनी इंग्रजीतूनच केलं. आतापर्यंतच्या वाचनात त्यांनी राष्ट्रवादीच्या 53 आमदारांंपैकी 41 आमदारांचे पाठिंबा अजित पवार यांच्याकडे असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच असून, अजित पवांराचा गटच हीच खरी राष्ट्रवादी आहे असा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -

अजित पवार गटाचे 41 आमदार पात्र

29 जूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस हा एकच पक्ष होता. मात्र 30 जून रोजी अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रामध्ये पक्षावर एकहाती सनियंत्रण मिळविले. एकूण 53 आमदारांपैकी 41 आमदारांचा पाठिंबा हा अजित पवार यांना होता. त्यामुले विधिमंडळातील संख्याबळ हा निकष पाहता खरी राष्ट्रवादी ही अजित पवार यांचीच आहे. त्यामुळे अजित पवार गटाचा एकही आमदार अपात्र नाही. अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना अपात्र करा अशी मागणी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी केली होती. मात्र, माझ्यापुढे उपलब्ध असलेल्या कागदपत्रानुसार, अजित पवार गटाचे सर्व 41 आमदार पात्र आहे त्यामुळे खरी राष्ट्रवादी दादांचीच असल्याचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी त्यांच्या वाचनात म्हटले.

पक्षांतर्गत विरोध म्हणजे पक्ष सोडणे नव्हे

पक्षातील मतभेद हे कायम असतात. शरद पवारांच्या मनाविरुद्ध जाणे म्हणजे पक्ष सोडणं असं होत नाही. आमदारांच कृत्य ही बाब कोणत्याही अध्यक्षांच्या विरोधातील नसते. पक्षांतर्गंत मतभेद किंवा विरोध याचा अर्थ पक्षत्याग करणं नव्हे. त्यामुळे कोणत्याही कायद्याचा भंग झालेला नाही. असं महत्वाचे निरीक्षण अध्यक्ष नार्वेकर यांनी नोंदविले. त्यांमुळे अजित पवारांचे सर्व आमदार पात्र आहे. अजित पवार गट हा मूळ पक्ष असल्याचे नार्वेकर म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : Maratha Reservation: सरकारची हायकोर्टात धाव; कोर्टानं जरांगेंना झापलं, उपचार घेण्यात तुम्हाला अडचण काय?

पवारांनी दहाव्या शेड्यूलचा गैरवापर करु नये

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न शरद पवार गटाने करू नये, तसेच शरद पवार गटाने दहाव्या शेड्यूलचा गैरवापरही करु नये, पक्षातील मतभेद म्हणजे कायद्याचा भंग नाही. पक्षांतर्गंत नाराजी म्हणजे विधिमंडळ नाराजी नसल्याचेही निरीक्षणही अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोंदविले आहे.

हेही वाचा : Amol Kolhe : अजित पवारांच्या ‘काकाका’ टीकेला अमोल कोल्हेंचे कवितेतून चोख प्रत्युत्तर, म्हणाले…

शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे आमदार पात्र

मूळ राष्ट्रवादी कुणाची याबाबत आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला आहे. राष्ट्रवादी हा पक्ष अजित पवार गटाला देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेनेच्या निकालासाऱखेच दोन्ही गटांचे आमदार पात्र ठरविले. 10 जानेवारी रोजी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देताना दोन्ही गटांचे आमदार पात्र ठरविले होते. त्याच निकालाची पुनरावृत्ती राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकाल देताना केल्याचे दिसून येतेय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -