घरमहाराष्ट्रNCP MLA: जयंत पाटलांचे भाचे प्राजक्त तनपुरेंनी अखेर मनातलं सांगितलं; भाजपा प्रवेशावर...

NCP MLA: जयंत पाटलांचे भाचे प्राजक्त तनपुरेंनी अखेर मनातलं सांगितलं; भाजपा प्रवेशावर केलं मोठं वक्तव्य

Subscribe

अहमदनगर: काँग्रेसमधून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात उडी घेतली. त्यानंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना वेग आला. याबाबत आता जयंत पाटील यांचे भाचे आणि राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. चाभी तालुक्यातील मिरी-तिसगाव बैठकीनंतर आमदार तनपुरे यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. (NCP MLA Jayant Patil nephew Prajakta Tanpur finally spoke his mind A big statement was made on BJP s entry)

आमदार तनपुरे म्हणाले की, जयंत पाटील यांनी या चर्चांचे खंडन केलं आहे. आम्ही शरद पवार यांच्यासोबतच आहोत आणि भविष्यात देखील राहणार आहोत. भाजप दावा करत आहे की निवडणुकीत आम्ही सर्वाधिक जागा जिंकू तर भाजपने सांगावं की त्यांच मूळ लोक किती आहेत. आमच्याकडून त्यांच्याकडे गेलेले किती लोक आहेत, हेही सांगावं, असा टोला प्राजक्त तनपुरे यांनी लगावला आहे.

- Advertisement -

निवडणुकांवर तनपुरेंचं वक्तव्य

तनपुरे म्हणाले की, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, यांचे मागच्या दोन वर्षांपासून इलेक्शन झालेले नाही. या सर्व संस्था प्रशासक चालवत आहेत. जनतेतून आलेले प्रतिनिधी तिथे नाहीत. तर दुसरीकडे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी एक चर्चा ऐकली आहे की राज्यातील सहकार विभाग असा एक कायदा आणू पाहत आहे की, या संस्थांमधील संचालक मंडळ बरखास्त करून या सर्व संस्था अधिकाऱ्यांमार्फत चालवल्या जाणार आहेत, तसं एक विधेयक येणार असल्याची चर्चा सुरू आहे, असं आमदार प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भविष्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होतील की नाही अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला येत आहे, असं तनपुरे म्हणाले.

(हेही वाचा: Politics : “तुतारी” फक्त स्टेजवर…; अजित पवार गटाची टीका, आव्हाडांवरही साधला निशाणा )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -