Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय; जितेंद्र आव्हाडांचं ट्विट

मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय; जितेंद्र आव्हाडांचं ट्विट

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ज्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीमाना देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याबाबत आव्हाडांनी ट्विट करत माहिती दिली आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. पोलिसांनी 72 तासांत माझ्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही आव्हाडांनी केला आहे.

राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले की, पोलीसांनी माझ्या विरुद्ध 72 तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केले आणि तेही 354. मी या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे. लोकशाहीची हत्या.. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत.”

- Advertisement -

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कळवा खाडी पुलाचे उद्धाटन झाले. या उद्धाटन कार्यक्रमावेळी जितेंद्र आव्हाडांनी महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे.

- Advertisement -

आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच ठाण्यातील मुंब्रा बायपास रोडवर त्यांच्या समर्थकांनी तीव्र आंदोलन केले आहे. या रोडवर टायर जाळत आंदोलकांनी आपला निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी सकाळपासून मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विवियाना मॉल मारहाणी प्रकरणी अटक करण्यात आली होती. यावेळीही आव्हाडांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आरोप केला होता. याप्रकरणी कोर्टाने त्यांची 15 हजारांच्या जाममुचलक्यावर जामीनावर सुटका करण्यात आली. जितेंद्र आव्हाड यांनी हर हर महादेव या चित्रपटाला विरोध करत विवियाना मॉलमधील शो बंद पाडला, यावेळी प्रेक्षकांना मारहाण केल्याचा आरोपाखील त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हाला दोन दिवस पूर्ण होत नाही तोवर त्यांच्याविरोधात हा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


जितेंद्र आव्हाड पुन्हा अडचणीत, महिलेकडून विनयभंगाचा गुन्हा दाखल

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -