घरमहाराष्ट्र'टीका करणं सोपं, उद्धव ठाकरे होणं अवघड'; आव्हाडांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

‘टीका करणं सोपं, उद्धव ठाकरे होणं अवघड’; आव्हाडांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री लाईव्ह येत राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी लॉकडाऊनला विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवरल टीका केली. या टीकेला आता गृहराज्य मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. टीका करण सोपं, पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे, असं प्रत्युत्तर आव्हाड यांनी दिलं.

“पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय. टीका करणं सोपं आहे. पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे. स्वत: च्या हृदयात अनेक स्टेन्स असताना देखील ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायेत, त्यांना सलाम,” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सवाल देखील केले आहेत.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाड यांना विस्मरणाचा रोग झाला आहे, अशी टीका केली होती. या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं. “पहिली लाट आली तेव्हा, पीपीई कीट बंद केले, व्हेंटीलेटर्स बंद केले, साधनसामुग्री देणं बंद केलं. ते जे २० लाख कोटींचं बोलतायत, त्यातले महाराष्ट्राला किती कोटी आले त्याची माहिती घ्या. २० लाख कोटीमधील महाराष्ट्राला किती आले, हे जाहीर करा मग दूध का दूध और पानी का पानी होईल, मग विस्मरणाचा रोग मला झाला आहे की कोणाला झाला हे साऱ्या जनतेला कळेल,” असं जोरदार प्रत्युत्तर आव्हाड यांनी फडणवीस यांना दिलं.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -