घरताज्या घडामोडीसत्तेची हवा डोक्यात; क्षुल्लक कारणावरुन राष्ट्रवादीच्या आमदाराने मारली पोटात लाथ

सत्तेची हवा डोक्यात; क्षुल्लक कारणावरुन राष्ट्रवादीच्या आमदाराने मारली पोटात लाथ

Subscribe

क्षुल्लक कारणावरुन राष्ट्रवादीच्या आमदाराने पोटात लाथ मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

क्षुल्लक कारणावरुन राष्ट्रवादीच्या आमदाराने पोटात लाथ मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाला ठोकल्याच्या रागातून अकोल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी पोटात लाथ मारल्याची तक्रार एका ग्रामस्थाने केली आहे. यावरुन राजूर पोलीस ठाण्यात आमदार लहामाटे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून ही सत्तेची हवा असल्याचा संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नेमके काय घडले?

अकोले येथील खडकी गावातून रामदास लखा बांडे (४०) यांनी सांगितले की आपण पायी जात असताना पाठीमागून एका भरधाव वेगाने गाडी आली. आम्हाला कट मारुन ती पुढे गेली. कोणी तरी पर्यटक असावेत म्हणून आम्ही जोरात ओरडून गाडी हळू चालवा, असे म्हणालो. त्यावर काही अंतरावर जाऊन ती गाडी थांबली. त्यातून आमदार लहामटे उतरले व म्हणाले, ‘मला ओळखले का मी कोण आहे,’ असे म्हणून माझ्या पोटात त्यांनी लाथ मारली आणि शिवीगाळ करून ते निघून गेले.

- Advertisement -

दरम्यान, रामदास बांडे यांच्या तक्रारीवरून राजूर पोलीस ठाण्यात आमदार लहामटे यांच्याविरूद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा – Corona Vaccine येवो वा न येवो, या महिन्यापर्यंत सगळं सुरळीत होणार! AIIMS मधून पुष्टी!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -