घरताज्या घडामोडीशिवाजी महाराजांच्या पुतळ्याला घोड्यावर चढून घातला हार, व्हायरल व्हिडिओने आमदाराला अश्रू अनावर

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला घोड्यावर चढून घातला हार, व्हायरल व्हिडिओने आमदाराला अश्रू अनावर

Subscribe

मी एकटाच पुतळ्यावर चढलो नव्हतो.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हिंगोलीच्या वसमतचे आमदार राजू नवघरे (NCP MLA Raju navghare)  यांनी शिवाजी महाराजांच्या घोड्यावर उभे राहत महाराजांच्या पुतळ्याला (Shivaji Maharaj Statue) पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर या प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि आमदार राजू नवघरे यांना अश्रू अनावर झाले. महाराजांना पुष्पहार अर्पण करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदार राजू नवघरे यांच्यावर जोरदार टीका कारण्यात येत आहे.

वसमत शहरात बहुप्रतिक्षित शिवजी महाराजांच्या पुतळा उभारण्यात येणार होता. महाराजांच्या पुतळ्यासाठी सर्व पक्षीय नेते त्या ठिकाणी उपस्थित होते. मात्र महाराजांचा पुतळा ट्रकमध्ये होता. पुतळ्याला हार कोणी घालायचा यासाठी राजू नवघरे यांना पुढे करुन पुष्पहार अर्पण करण्यास सांगितले आणि आमदार राजू नवघरे हे थेट शिवजी महाराजांच्या पुतळ्यावर चढले. त्यांनी घोड्यावर पाय दिला आणि महाराजांना पुष्पहार अर्पण केला. श्रेय घेण्याच्या नादात आमदारांना आपण काय करतोय याचे भान राहिले नाही. महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी केवळ राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरेच नाही तर शिवसेनेचे माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा हे ही दिसत आहेत. तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते राजेश पवार यांचा देखील समावेश आहे.

- Advertisement -

आमदार राजू नवघरे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांनी या प्रकाराविषयी सर्वांची माफी मागितली. ते म्हणाले, ‘महाराजांच्या पुतळ्यावर चढून घोड्यावर पाय देऊन मी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला त्यात माझी चूक झाली असेल तर मी सर्वांची माफी मागतो. कोणाची इच्छा नसेल तर अशा सार्वजनिक कार्यक्रमांना मी उपस्थित राहणार नाही.’

त्याचप्रमाणे ‘महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी मी एकटाच चढलो नव्हतो. व्हायरल व्हिडिओमध्ये केवळ माझेच नाव घेतले जात आहे. मी एकटाच पुतळ्यावर चढलो नव्हतो. माझ्यामागे मंत्री जयप्रकाश मुंदडा तसेच भाजपचे शहराध्यक्ष आणि शिवसेनेचे नगराध्यक्ष देखील पुतळ्यावर चढले होते. मी एकट्यानेच पाप केले असेल तर मी फाशीवर जाण्यास तयार आहे. मला शिक्षा द्या. पण काहीही चुक नसताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला टार्गेट करण्याचे काम करत आहेत’, असा आरोप देखील आमदार राजू नवघरे यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – केंद्रीय यंत्रणांचा राजकीय हेतूने गैरवापर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -