Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र 'खोटं बोलायचं, रेटून बोलायचं जुनी सवय'; फडणवीसांच्या त्या वक्तव्यावरुन रोहित पवारांची टीका

‘खोटं बोलायचं, रेटून बोलायचं जुनी सवय’; फडणवीसांच्या त्या वक्तव्यावरुन रोहित पवारांची टीका

Subscribe

देशात पेट्रोलचा दर शंभरी पार गेला आहे. यामुळे विरोधक केंद्रातील भाजप सरकारवर टीका करत आहेत. राज्यात काँग्रेसने महागाईविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. तर राज्यातील विरोधी पक्ष भाजपचे नेते पेट्रोल दरवाढीसाठी राज्य सरकारला जबाबदार धरत आहेत. पेट्रोलच्या वाढत्या दरांवरुन टीका करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल शुक्रवारी पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले १२ रुपये राज्यांना मिळतात, असं वक्तव्य केलं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत फडणवीस यांचं विधान हास्यास्पद असल्याचं म्हटलं आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपवर टीकास्त्र डागलं आहे. “खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजप नेत्यांची जुनी सवयच आहे. पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले १२ रुपये राज्यांना मिळतात असं हास्यास्पद विधान भाजपकडून पुण्यात करण्यात आलं. देशात इतर कुठंही ही चलाखी चालून गेली असती पण महाराष्ट्रात नाही,” असं रोहित पवार यांनी ट्विटमधून म्हटलं आहे. यामध्ये त्यांनी एक वस्तुस्थिती सांगणारा एक व्हिडिओ देखील ट्विट केला आहे.

- Advertisement -

केंद्राचं अपयश लपवण्याचा प्रयत्न

“केंद्र सरकार आकारत असलेल्या पेट्रोल वरील करात राज्याला किती पैसे मिळतात? तर केंद्र सरकार पेट्रोलवर आकारत असलेल्या ३२.९० रुपयांपैकी महाराष्ट्राला केवळ साडे तीन पैसे मिळतात. तरी केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी आपण मात्र राज्याला १२ रुपये मिळत असल्याचे सांगता,” असा टोला रोहीत पवार यांनी फडणवीसांना लगावला आहे. विरोधकांना साडेतीन पैशाच्या ठिकाणी १२ रुपये दिसत असतील तर याला काय म्हणावं? सगळीकडं अधिवेशनातील बाराचाच आकडा दिसत असेल तर त्याला इलाज नाही. दिवसाढवळ्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत असं धडधडीत खोटं बोलणं कुठल्याही नेतृत्वाला शोभणारं नाही, असा टोला देखील रोहित पवार यांनी लगावला.

- Advertisement -

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -