Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र रोहित पवार यांच्या 'त्या' रॅप साँगची सर्वत्र चर्चा

रोहित पवार यांच्या ‘त्या’ रॅप साँगची सर्वत्र चर्चा

Subscribe

रोहित पवार यांनी रॅप साँग लॉन्च केल्यानंतर अल्पावधीच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हे रॅप साँग शुभम जाधव यांनी गाणे गायले असून या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या रॅप साँगला तरुणांच्या चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी जनजागृतीसाठी तयार केलेले रॅप साँगला तरुणांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सध्याच्या काळातील ट्रेन्ड लक्षात घेऊन रोहित पवार यांनी नुकतेच महाराष्ट्र व्हिजन फोरम (Maharashtra Vision Forum) युवा केंद्रित सामाजिक उपक्रमाचे रॅप साँग (Rap Song) लॉन्च केले आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील युवक-युवतींना एकत्रित आणून राज्याच्या भविष्याच्या धोरण निर्मितीमध्ये सहभागी करून घेतात. या माध्यमातून राज्यातील विविध शहरांमधील महाविद्यालयात जाऊन रोहित पवार हे तरुण-तरुणींशी संवाद साधणार आहेत. रोहित पवार हे युवांशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहे. या उपक्रमात आतापर्यंत पाच लाखांहून अधिक युवा सहभाग नोंदविला आहे.

 

- Advertisement -

राज्याच्या राजकारणात युवा रॅपर्स आणि राजकारणी यांचे एक वेगळे समीकर पाहायला मिळाते. यात आता महाराष्ट्र व्हिजन फोरम या युवा केंद्रित सामाजिक उपक्रमाबद्दल सांगण्यात आले आहे. अनेक रॅप साँगमध्ये शिव्या, अर्वाच्य भाषणा एकायला मिळतात. परंतु, महाराष्ट्र व्हिजन फोरमच्या रॅपमध्ये दरजेदार शब्दांची बांधणी करून उपक्रमाचा उद्देश आणि संकल्पना अतिशय उत्तम प्रकारे मांडण्याचा प्रयत्न करते.

- Advertisement -

रोहित पवार यांनी रॅप साँग लॉन्च केल्यानंतर अल्पावधीच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हे रॅप साँग शुभम जाधव यांनी गाणे गायले असून या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या रॅप साँगला तरुणांच्या चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नवीन पिढीला शोभेल आणि समजले अशासाठी रॅप साँगचा वापर करून लोकापर्यंत पोहोवण्याचा प्रयत्न या फोरच्या माध्यमातून केला जात आहे.

 

- Advertisment -