घरमहाराष्ट्रMPSC च्या जागांची यादी पाठवलीय, आमदारांची यादी नसल्याने मंजूर कराल; रोहित पवारांचा...

MPSC च्या जागांची यादी पाठवलीय, आमदारांची यादी नसल्याने मंजूर कराल; रोहित पवारांचा राज्यपालांना टोला

Subscribe

राज्य सरकारने MPSC सदस्यांची यादी पाठवली असून विधान परिषद आमदारांची यादी नसल्याने ती यादी तातडीने मंजूर करतील असा विश्वास वाटतो, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ जुलैपर्यंत MPSC च्या सदस्यांच्या रिक्त जागा भरु असं जाहीर केलं होतं. यावरुन एका युजर्सने ट्विट करुन प्रश्न उपस्थित केला. यावर रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे.

महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावांची यादी राज्यपाल यांच्याकडे पाठवली आहे. मात्र, अद्याप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ती यादी मंजूर केलेली नाही. हाच मुद्दा पकडत रोहित पवार यांनी राज्यपाल यांना उपहासात्मक टोला लगावला.

- Advertisement -

एका ट्विटर यूजर्सने “३१ जुलै च्या आधी MPSC आयोगातील सदस्य भरणार होते काय झालं?” असा प्रश्न उपस्थित केला. यावर रोहित पवार यांनी उत्तर दिलं. “माननीय अजित पवारदादा हे शब्द पाळणारे नेते आहेत. MPSC च्या सदस्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी सरकारने ३१ जुलै पूर्वीच राज्यपाल महोदयांकडं सदस्यांची यादी पाठवलीय. ती विधान परिषदेच्या आमदारांची यादी नसल्याने महामहीम राज्यपाल महोदय तातडीने मंजूर करतील, असा विश्वास आहे,” असं उत्तर रोहित पवार यांनी दिलं.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -