घरताज्या घडामोडीCorona positive : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार कोरोना पॉझिटिव्ह

Corona positive : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि काही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावेत, अशा प्रकारचं ट्विट आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. तसेच या संदर्भातील माहिती रोहित पवार यांनी स्वत: ट्विट करत दिली आहे.

माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी

तुमच्या सोबत त्याच्याशी लढत असताना गेली दोन वर्षे त्याला हुलकावणी देत होतो, पण अखेर त्याने मला गाठलंच. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली. पण आपला आशीर्वाद असल्याने काळजीचं काही कारण नाही. माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि काही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावेत, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

- Advertisement -

राज्यातील अनेक राजकीय नेते आणि मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. रोहित पवार यांच्याआधी महाविकास आघाडीतील अजून एका आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेस आमदार धिरज देशमुख यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यासंबंधातील माहिती त्यांनी ट्विटवरून दिली आहे.

- Advertisement -

धिरज देशमुख कोरोना पॉझिटिव्ह

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्याने सध्या मी पुढील उपचार घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे माझी तब्येत चांगली आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असं ट्विट धिरज देशमुख यांनी केलं आहे.

दरम्यान, रोहित पवार आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थी, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -