घरमहाराष्ट्ररोहित पवारांचा पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा; म्हणाले, दुर्दैवाने...

रोहित पवारांचा पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा; म्हणाले, दुर्दैवाने…

Subscribe

मुंबईः महाराष्ट्रात क्षमता असूनही उद्योग पाठ फिरवत असल्याची सल मनात आहे, अशी टीका राष्ट्ववादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे. Foxconn कंपनीच्या प्रकल्पाचे तेलंगणामध्ये काल उद्घाटन झाले. यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करुन सरकारवर निशाणा साधला.

- Advertisement -

तेलंगणात ४१०० कोटींची गुंतवणूक असलेल्या आणि सुमारे २५००० हून अधिक प्रत्यक्ष रोजगार निर्मिती करणाऱ्या Foxconn कंपनीच्या प्रकल्पाचं सोमवारी भूमिपूजन झालं. तेलंगणा सरकारने मार्चच्या पहिल्या आठवड्यात कंपनीसोबत एमओयू केला आणि २ महिन्याच्या आत प्रकल्पाचे भूमिपूजनही झाले, याला म्हणतात वेगवान सरकार. केवळ जाहिराती लावून गवगवा करून सरकार वेगवान होत नाही. तर त्यासाठी कामही करावं लागतं. तेलंगणा सरकारची दूरदृष्टी आणि तेथे असलेले उद्योग स्नेही वातावरण यामुळे प्रकल्पास गती देण्यास मदत झाली असं Foxconn कंपनीकडून सांगण्यात आलं. महाराष्ट्रात मात्र दुर्दैवाने तशी स्थिती राहिली नाही, अशी टीका रोहित पवार यांनी ट्वीटमधून केली आहे.

Foxconn प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर निशाणा साधला. मात्र तेलंगणातही Foxconn चा प्रकल्प होत आहे. इतक्या वेगाने तेथील सरकारने या प्रकल्पाची कार्यवाही पूर्ण केली. महाराष्ट्राला हा वेग जमला नाही, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी ट्वीटमधून केली आहे. 

- Advertisement -

गेल्या महिन्यातही आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करुन सरकारवर निशाणा साधला होता.  सुमारे २३०० कोटी रुपयांचा प्रकल्प तामिळनाडू सरकारने खेचून नेला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र महाराष्ट्राबाबत अशा बातम्या दिसत नाही. आपलं राज्य मागे पडत असल्याचं दुःख होतंय, असा टोला आमदार रोहित पवार यांनी सरकारला लगावला होता. जगभरात प्रसिद्ध असलेल्या नाइकी आणि आदिदास कंपन्यांचे उत्पादन बनवणारी पो चेन कंपनी भारतात गुंतवणूक करत आहे. या कंपनीचा सुमारे २३०० कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. यातून २० हजार रोजगार निर्मिती होणार आहे. हा प्रकल्प तामिळनाडू सरकारने खेचून नेला. यासाठी रोहित पवार यांनी ट्वीट करुन तामिळनाडू सरकारचे कौतुक केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -