घरताज्या घडामोडीरोहित पवारांचा उद्या अयोध्या दौरा, अचानक दौऱ्यामुळे चर्चांना उधाण

रोहित पवारांचा उद्या अयोध्या दौरा, अचानक दौऱ्यामुळे चर्चांना उधाण

Subscribe

यंदा राजकीय पक्षांतील नेत्यांना अयोध्येत जाण्याची इच्छा होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर शिवसेना यानंतर राष्ट्रवादीकडून अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे. परंतु राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सर्वांच्या आधीच अयोध्या दौरा करत असून रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. रोहित पवार उद्याच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. दुपारपर्यंत अयोध्येत दाखल होतील असे सांगण्यात आले आहे. परंतु अचानक रोहित पवार अयोध्या दौऱ्यावर कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरुन राजकीय वादंग सुरु असताना रोहित पवारांनी अयोध्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवारांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे. रोहित पवार यांच्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून अयोध्या दौऱ्याची घोषणा करण्यात आली आहे. पुढील महिन्यात राज ठाकरे अयोध्या दौरा करणार आहेत. तर याच महिन्यात शिवसेनेचा अयोध्या दौरा आहे. पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे अयोध्या दौरा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

आमदार रोहित पवार उद्या म्हणजेच शनिवारी दुपारी १२ वाजता अयोध्येला पोहोचणार आहेत. श्री रामांचे दर्शन रोहित पवार घेतील. दिल्लीत काही कामानिमित्त गेल्यामुळे तिथूनच ते रामलल्लाच्या दर्शनाला जाणार आहेत. रोहित पवार यांचा दौरा अचानकच ठरला असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. परंतु दोन राजकीय नेत्यांचे दौरे ठरले असताना रोहित पवार यांनी वेळ साधून अयोध्या दौरा करण्याचे ठरवलं आहे.

पुढच्या महिन्यात मनसेचा दौरा

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या नियोजनासाठी अलीकडेच मुंबईतील विभाग अध्यक्षांची एक बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर मनसेचे एक शिष्टमंडळ लवकरचं अयोध्येसाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भेटीसाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. पोस्टरमधून राज ठाकरेंच्या 5 जूनच्या अयोध्या दौऱ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Ravi Rana: एका महिलेशी केलेले गैरवर्तन राज्याने पाहिले, रवी राणांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -