आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला भीषण अपघात, BMW कार आणि एसटीची जोरदार धडक

NCP MLA Sangram Jagtap BMW car accident rammed by ST bu in pune mumbai highway
आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला भीषण अपघात, BMW कार आणि एसटीची जोरदार धडक

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप (NCP MLA Sangram Jagtap) यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. आमदार जगताप यांना सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही. परंतु एसटी बस आणि बीएमडब्लू गाडीची (BMW) जोरदार धडक झाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये गाडीच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. तर एसटीचा मागचा भागसुद्धा चेंबला आहे. मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai Pune Expressway)  हा अपघात झाला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप भीषण अपघातामधून बचावले आहेत. त्यांची बीएमडब्लू गाडी आणि एसटी बसची धडक झाली आहे. मुंबई-पुणे महामार्गावर हा अपघात झाला. अपघाताची तीव्रता भयानक होती. गाडीचा चक्काचूर झाला आहे. परंतु आमदार संग्राम जगताप यांना कोणतीही दुखापत झाली नाही. पहाटे ५.३० वाजताच्या दरम्यान ते प्रवास करत होते. महामार्गावर रसायनी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा अपघात झाला आहे.

आमदार संग्राम जगताप सुखरुप आहेत. दरम्यान अपघातानंतर मुंबई-पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्ठळी धाव घेऊन वाहतूक कोंडी सुरळीत केली आहे. दरम्यान आमदार जगताप यांच्या गाडीला अपघात कसा झाला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच आमदार जगताप यांनी या अपघाताबद्दल अद्याप कोणतेही मत व्यक्त केले नाही.

मुंबई आग्राम मार्गावर अपघात

मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये क्रूझर आणि रिक्षाची धडक झाली. रिक्षाचा चक्काचूर झाला असून यामध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. भरधाव येणाऱ्या ट्रकने रिक्षाला धडक दिली. जखमींवर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहे. जखमी झालेले पारोळा तालुक्यातील तरडी गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.


हेही वाचा : लातूरकरांना तब्बल 45 दिवसांनंतर स्वच्छ पाणीपुरवठा सुरू