घरदेश-विदेशखासदार अमोल कोल्हेंचा शिवनेरीवरील शिवजन्मोत्सवावर बहिष्कार; 'या' गोष्टींवरून सरकारवर व्यक्त केली नाराजी

खासदार अमोल कोल्हेंचा शिवनेरीवरील शिवजन्मोत्सवावर बहिष्कार; ‘या’ गोष्टींवरून सरकारवर व्यक्त केली नाराजी

Subscribe

पुण्यातील शिवनेरीवर साजरा होणाऱ्या शासकीय शिवजयंती सोहळ्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी बहिष्कार करत असल्याचं जाहीर केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गटावर अद्याप भगवा ध्वज न फडकवल्याने अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त करत बहिष्काराची भूमिका घेतली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त किल्ले शिवनेरीवर विविध शासकीय कार्यक्रम होतात. खासदार अमोल कोल्हे स्वत: जुन्नरचे रहिवासी असून त्यांच्या शिरुर लोकसभा मतदारसंघात हा शिवनेरी किल्ला येतो. दरम्यान खासदार अमोल कोल्हे यांनी शिवनेरी गडावर कायस्वरुपी भगवा ध्वज लावण्याची मागणी केली होती. मात्र त्यांच्या मागणीला केंद्र किंवा राज्य सरकारने दाद दिली नाही. यामुळे अमोल कोल्हे यांनी शिवसेनेवरील शासकीय शिवजयंतीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत हा निर्णय जाहीर केलं आहे.

- Advertisement -

शिवनेरीवरील शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमावरील बहिष्कारासंदर्भात अमोल कोल्हे म्हणाले की, शिवनेरी किल्ल्यावर होणाऱ्या शासकीय शिवजयंतीच्या कार्यक्रमाची पत्रिका मला मिळाली आहे. त्यासाठी सरकारचे आभार मानतो. मी शिवजयंती साजरी करणारच आहे. शिवभक्तांसाठी हा मोठा सण आहे. पण त्याच बरोबर शिवजयंतीच्या निमित्ताने किल्ले शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या शिवजयंतीच्या शासकीय कार्यक्रमावर खासदार म्हणून मी बहिष्कार करत आहे, अस त्यांनी जाहीर केलं.

- Advertisement -

या भूमिकेत कोणाचाही विरोध, कोणाचाही निषेध नाही. पण एक जाणीव करुन देणं फार महत्त्वाचं आहे की, एवढी वर्षे झाली तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थान असलेल्या शिवनेरीवर अजूनही कायमस्वरुपी भगवा ध्वज नाही. 2021 पासून मी सातत्याने ही मागणी करतोय. अनेक मंत्र्यांना आणि वरिष्ठ नेत्यांना भेटून मी किल्ले शिवनेरीवर कायमस्वरुपी भगवा ध्वज लावण्याची मागणी करत आहे. संसदेत देखील हा मुद्दा किंवा ही मागणी मी केली आहे. एवढंच नाही तर संसदेच्या अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतलेल्या बैठकीतही मागणी केली होती. भगवा ही आमची अस्मिता आहे आणि शिवभक्तांचा फार मोठा गर्व आहे, ही शिवभक्तांची भावना आहे, या सगळ्यांचा आदर करुन महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे आग्रही भूमिका घ्यावी मात्र या दृष्टीने ठोस पावलं उचचली जात नाहीत. राज्यांच्या जन्मस्थानावर भगवा ध्वज नसल्याची जाणीव करुन देण्यासाठी मी शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहे, असं त्यांनी नमूद केलं आहे.

शिवनेरी गडावर जाणारचं पण वर शासकीय कार्यक्रम सुरु असताना खाली ज्या शिवभक्तांना अडवून ठेवलं जातं त्या अशिवप्रेमींसोबत मी कार्यक्रमाच्या वेळी असेन, शिवभक्तांसमवेत भगवा ध्वज खांद्यावर घेऊन किल्ले शिवसेनेवर जाऊन महाराजांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेईन, त्यामुळे हे खास भगवं आंदोलन करत आहे, असं त्यांनी नमूद केलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा 393 वी जयंती साजरी होत असून महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 दिवस पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने किल्ले शिवनेरीवर तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहे. मात्र यात खासदार अमोल कोल्हेंच्या अनुपस्थितीवरून नव्या चर्चां रंगत आहेत.


दक्षिण आफ्रिकेच्या 12 चित्त्यांचा गट 18 फेब्रुवारीला पोहोचणार भारतात; वाचा त्यांचा संपूर्ण प्रवास

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -