घरताज्या घडामोडी'कलाकारांची गळचेपी होत असेल तर नक्कीच कारवाई होईल',किरण माने प्रकरणावर डॉ. अमोल...

‘कलाकारांची गळचेपी होत असेल तर नक्कीच कारवाई होईल’,किरण माने प्रकरणावर डॉ. अमोल कोल्हेंची प्रतिक्रीया

Subscribe

किरण माने यांनी  राजकीय पोस्ट केली म्हणून त्यांना मालिकूतून काढून टाकण्यात आले अशी नोटीस त्यांच्याकडे असेल तर त्यांनी ती नोटीस माध्यमांसमोर आणावे.  कारण अशाप्रकारे गळचेपी होत असेल तर ती महाराष्ट्राच्या राजकीय आणि कलासंस्कृतीला शोभणारी नाही.

अभिनेते किरण माने (Kiran Mane)  यांनी सोशल मीडियावर राजकीय मत मांडल्याने त्यांना स्टार प्रवाहवरील (Star Pravah )   मुलगी झाली हो ( Mulgi Jhali Ho )   या मालिकेतून काढून टाकले. यानंतर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रीया समोर आल्या आहेत. प्रसिद्ध अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe)  यांनी देखील व्हिडीओ  शेअर प्रतिक्रीया दिली आहे. ‘मी नेहमीच राजकीय वक्तव्य करत असतो मात्र मला कोणत्याच वाहिनीकडून अशाप्रकारचा अनुभव आला नाही. परंतु अभिनेते किरण माने यांना सोशल मीडियावर राजकीय पोस्ट केली म्हणून मालिकेतून काढून टाकले असेल तर कलाकारांची गळचेपी होत असेल तर त्याचा नक्कीच विरोध होईल’, असे डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

अभिनेते किरण माने यांनी  राजकीय पोस्ट केली म्हणून त्यांना मालिकूतून काढून टाकण्यात आले अशी नोटीस त्यांच्याकडे असेल तर त्यांनी ती नोटीस माध्यमांसमोर आणावी.  कारण अशाप्रकारे गळचेपी होत असेल तर ती महाराष्ट्राच्या राजकीय आणि कलासंस्कृतीला शोभणारी नाही. अशी नोटीस अभिनेते किरण माने यांना आली असेल तर त्याचा विरोध नक्कीच होईल, असा विश्वास डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्ती केला आहे.

- Advertisement -

अमोल कोल्हे पुढे म्हणाले,  या विषयावर भाष्य करणे मला महत्त्वाचे वाटले. कारण सोशल मीडियावर कलाकारांनी अशाप्रकारचे राजकीय वक्तव्य केल्यास त्यांना मालिकेतून काढले जाते का? खरंच असे होते का? हे जाणून घेण्यासाठी हे प्रकरण मला महत्त्वाचे वाटते. कारण मीमागील २ वर्षापासून शिरुर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत आहे. ज्या गोष्टी पटत नाहीत किंवा खटकतात त्याविरोधात मी नेहमीच व्यक्त होत असतो. मात्र असे असताना मला कोणत्याच वहिनीकडून अशाप्रकारचे कोणताही अनुभव आला नाही असे अमोल कोल्हे म्हणाले. ज्या वेळेस मी निवडणूक लढवत होतो तेव्हा झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका करत होतो तेव्हा वाहिनीकडून अशा प्रकारचे कोणताही विरोध करण्यात आला नाही.

अनेक वाहिन्यांवर मी मालिका केल्या तेव्हा मी राजकारणात सक्रीय होतो. मात्र कोणत्याही वाहिनीकडून केवळ मी राजकीय भूमिका घेतो म्हणून मला टाळण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही. अनेक ठिकणी कलाकार राजकीय भूमिका घेत असूनही त्यांच्या मालिका सुरू आहेत तसेच कोणत्याही वाहिनीने त्यांच्यावर कारवाई केली अशी कोणताही बाब माझ्या निदर्शनास आली नाही. त्यामुळे केवळ सोशल मीडियावर राजकीय पोस्ट केली म्हणून मालिकेतून काढून टाकले जाते यावर माझा व्यक्तीश: विश्वास बसणे अवडघड आहे असे अमोल कोल्हेंनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –  ‘महाराष्ट्र ही वैचारीक दडपशाही खपवून घेणार नाही’, बाळासाहेब थोरात अभिनेते किरण मानेंच्या पाठीशी

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -