घरमहाराष्ट्र'अफजल खान व्यक्ती नाही तर प्रवृत्ती'; कोल्हेंची भाजपला अफजल खानाची उपमा

‘अफजल खान व्यक्ती नाही तर प्रवृत्ती’; कोल्हेंची भाजपला अफजल खानाची उपमा

Subscribe

डॉ. अमोल कोल्हेंनी भाजपला अफजल खानाची उपमा दिली आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजप पक्षाला अफजल खानाची उपमा दिली आहे. मात्र, अफजल खानाचे स्वराज्यावर असे चालून येणे म्हणजे ही संधी समजा, असे अमोल कोल्हे म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मोठमोठ्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, पक्षाच्या या परिस्थितीत डगमगून न जाता कामाला लागण्याचे आवाहन अमोल कोल्हे यांनी दिली आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने युवा संवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोल्हे यांनी पक्षाला लागलेली पडझड हे पक्षावरील संकट न मानता संधी असल्याचे माना, असे आवाहन केले.

हेही वाचा – गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट लावली – जितेंद्र आव्हाड

- Advertisement -

काय म्हणाले अमोल कोल्हे?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजाल खान यांच्यावर कशाप्रकारे विजय मिळवला यासंदर्भात सांगितले. अमोल कोल्हे म्हणाले की, ‘स्वराज्यावर अफजल खान असाच चालून आला होता. तेव्हा सर्वांना त्याची भीती वाटली. त्याच्या बलाढ्य सेनेकडे पाहून अनेकांना धडकी भरली. त्याने सरदारांन, मांडलिकांना सामील व्हाल तरच सुरक्षित रहाल असे फर्मान दिले. त्यामुळे बरेच सरदार सामील झाले. आता तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ही इतिहासाची पुनरावृत्ती निर्माण झाली आहे. परंतु, महाराजांनी यातून संधी शोधली. शिवाजी महाराजांसमोरही शरणागती पत्कारण्याचा पर्याय उपलब्ध होता. परंतु, मोठ्या युद्धाचा पराभव केला तर तर सर्वांना कळेल की शिवाजी महाराज काय आहे. ही संधी होती. महाराजांनी अनेक संकटांमधून संधी शोधली. त्यामुळे आपण महाराजांचे मावळे असून आपण या परिस्थितीतून संधी शोधायची. वतनासाठी जीव देणाऱ्या मावळ्यांच्या जीवावर शिवाजी महाराजांनी अफजल खानचा पराभव केला. अफजल खान ही व्यक्ती नाही तर प्रवृत्ती आहे.’ या कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा चांगलाच उत्साह पाहायला मिळाला.

- Advertisement -

हेही वाचा – अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४ आमदारांचा बहुचर्चित भाजप प्रवेश बुधवारी पार पडला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -