प्रत्येक पक्षाला आपला मुख्य़मंत्री व्हावा हे वाटणं यात गैर काय? मुंडेंच्या मुख्यमंत्री पदाच्या विधानावर सुप्रिया सुळेंच वक्तव्य

It is an insult to Maharashtra not to allow Deputy Chief Minister Ajit Pawar to speak, said Supriya Sule
सुप्रिया सुळे

राज्यात एकीकडे राज्यसभा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांवरून महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजपा असा वाद रंगताना दिसतोय. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमध्येचं मुख्यमंत्री पदावरून नवनवीन वक्तव्ये ऐकायला मिळत आहे. राज्यात सध्या महाविकास आघाडी सरकार असून शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. मात्र या मुख्यमंत्री पदाबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांमध्येच धुसफूस सुरु झाली आहे. काल साताऱ्यातील सभेत राष्ट्रावादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल, असं मोठं विधान केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलेय. अशात आज राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील पुन्हा मुख्यमंत्री पदाबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. प्रत्येक पक्षाला, आपला मुख्य़मंत्री व्हावा, हे वाटते, यात गैर काय? असा सवाल उपस्थित करत त्यांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा अशी अप्रत्यक्ष इच्छा व्यक्त केली. आज सकाळी एका कार्यक्रमादरम्यान त्या पत्रकारांशी संवाद साधत होत्या.

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, वास्तवतेत जगूया, आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. महाविकास आघाडीचं सरकार अतिशय उत्तम काम करतयं, पण प्रत्येक पक्षाला, आपला मुख्य़मंत्री व्हावा, हे वाटणं यात गैर काय? माझं मत आहे, ताटाचं वाटीत आणि वाटीचं ताटात. महाविकास आघाडी सरकार आहे यातील तिन्ही पक्षांनी मुख्यमंत्री पदाच्या मागे न लागता, सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही तिघं एकत्र आलोत.

“केंद्राकडे सुडाचे राजकारण करण्यापलीकडे काहीच काम नाही”

दरम्यान काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या ईडीच्या समन्सवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, यात मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण केंद्र सुडाचे राजकारणचं करत त्यांच्याकडे दुसरं काही राहिलं नाही. ज्या महिलेने इतकी वर्षे देशाची सेवा केली त्याचबरोबर त्यांना आता कोरोनाची लागणही झाली आहे. अस सगळं सुरु असताना त्यांना ईडीची नोटीस येणं दुर्दैव आहे. काहीतरी नवीन पद्धत या भाजपच्या लोकांनी सुरु केली आहे.

दरम्यान राज्यसभा निवडणुकीवरून शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय संघर्ष सुरु झालाय. दरम्यान काल महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी ही निवडणुक बिनविरोधात होण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवणीस यांची भेट घेतली. मात्र भेटीतील आघाडी सरकारचा प्रस्ताव फडणवीसांनी फेटाळून लावला. यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाविकास आघाडी सरकारचे सर्व ज्येष्ठ नेते स्वत:हून पुढाकार घेऊन देवेंद्र फडणवीसांना विनंती करण्यास गेले, हा महाविकास आघाडी सरकारचा मोठेपणा आहे. ते स्वत: उठून गेले. पण घोडेबाजार या गोष्टी कानावर पडतायत, वृत्तवाहिन्या, वर्तमान पत्रात वाचायला येत आहे हे दुर्दैव आहे, हे महाराष्ट्राला न शोभणारं आहे. दोन दशकांनंतर राज्यसभेची निवडणुक होणार आहे, हे कुठल्याही राज्याच्या राजकीय हिताचे नाही.


Kanpur Clash : कानपूर हिंसाचारानंतर पोलीस अॅक्शन मोडवर; 40 जणांविरोधात FIR, 1000 जण आरोपी म्हणून घोषित, 35 जणांना अटक