घरताज्या घडामोडीट्विट करणाऱ्यांनाच विचारावं लागेल; कंबोज यांच्या ट्वीटवर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया

ट्विट करणाऱ्यांनाच विचारावं लागेल; कंबोज यांच्या ट्वीटवर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया

Subscribe

भाजप नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा लवकरच तुरुंगात जाणार असल्याचा दावा केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, मोहित कंबोज यांच्या या ट्विटनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. मी बोलण्यापेक्षा ज्यांनी ट्विट केले,त्यांनाच जाऊन विचारावं लागले, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

- Advertisement -

सिंचन घोटाळ्याचा विषय आता संपला आहे. परंतु हा विषय आता पुन्हा एकदा काढला जातोय. याबाबत मला बोलता येणार नाही. पण ज्यांनी ट्विट केले, त्यांनाच जाऊन विचारावं लागेल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

कंबोज यांच्या ट्वीट नंतर राष्ट्रवीदीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत मोहित कंबोज कधीपासून एवढे मोठे नेते झाले अशी टीका केली आहे. काळ्या सोन्याचा व्यापार करणारा गुंड काहीतरी भाष्य करतो आणि त्याची बातमी होते. कोणताही नेता तुरुंगात जाऊ दे त्याची काळजी कंबोज यांनी कशाला करावी, असा सवाल विद्या चव्हाण यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

कंबोज यांचं ट्वीट नेमकं काय?

भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्वीटमध्ये सिंचन घोटळ्याची पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी केली आहे. २०१९ मध्ये परमबीर सिंह यांनी बंद केलेल्या सिंचन घोटाळ्याचा तपास पुन्हा एकदा सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच कंबोज यांनी या ट्वीटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आहे.


हेही वाचा : मोहित कंबोज पुराव्यांशिवाय बोलत नाहीत, आशिष शेलारांकडून कंबोजांची पाठराखण


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -