घरमहाराष्ट्रSupriya Sule : केंद्र सरकारने राज्य सरकार बरखास्त करावं, सुप्रिया सुळे यांची...

Supriya Sule : केंद्र सरकारने राज्य सरकार बरखास्त करावं, सुप्रिया सुळे यांची मागणी

Subscribe

पुणे : भाजपाचे कल्याण पूर्व मतदारसंघाचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटातील माजी नगरसेवक आणि जिल्हाप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. शिंदे गटाचे नेते गंभीर जखमी असून, त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांचे नियंत्रण उरले नाही. ही बाब मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कानावर टाकणार आहे. त्याचप्रामाणे अधिवेशनादरम्यान अमित शाह यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणा आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

बंदुकीच्या आम्ही विरोधात आहोत. मात्र इथे चक्क गोळीबार करण्यात आला आहे. देशातील सर्वात उत्कृष्ट पोलीस दल कुठले असेल तर ते महाराष्ट्रातले आहे. महाराष्ट्रातील एका पोलीस ठाण्यात सत्ताधारी आमदार गोळीबार करत असेल तर राज्यासाठी शरमेची बाब आहे. दिवसाढवळ्या पोलीस ठाण्यात भांडणे होतात. पोलिसांसमोर गोळीबार करण्याची हिंमत आमदाराची कशी होते. गृहमंत्र्यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा दिलाच पाहीजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

- Advertisement -

हेही वाचा… Kalyan Crime: इथेच आणायचा होता का महाराष्ट्र माझा? महेश गायकवाड गोळीबार प्रकरणी वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

कल्याणमध्ये घडलेल्या घटनेचा मी निषेध करते. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. या घटनचे चौकशी झाली पाहिज, ज्याने कुणी गोळीबार केला त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. घटनेमागे काही कारण असले तरी गोळीबार करण्याचा अधिकार कुणाला नाही. पोलिसांच्या समोर गोळीबार होत असेल तर ही सत्तेची मस्ती नाहीतर काय आहे? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी केला.

- Advertisement -

राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा घेताल पाहिजे. त्यांच्या आपापसातली जी काही भांडणे असतील ती त्यांनी सोडवावीत. यामध्ये महाराष्ट्रातील सामान्य माणूस भरडला जात आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. कुठेही आपण गोळी चालवू शकतो, असं त्यांना वाटत असेल तर हे गुंडाराज नाही तर काय? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -