घरमहाराष्ट्रNCP Mumbai President: अजित पवार गटाकडून मुंबईचा कारभार समीर भुजबळांकडे

NCP Mumbai President: अजित पवार गटाकडून मुंबईचा कारभार समीर भुजबळांकडे

Subscribe

राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अजित पवार गटाकडून पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष आणि सेलच्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली. मात्र, मुंबई शहराची जबाबदारी आता समीर भुजबळांकडे देण्यात आली आहे. माजी मंत्री नवाब मलिक हे आपल्यासोबत असल्याचा दावा वारंवार राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून केला जात आहे. (NCP Mumbai President From the Ajit Pawar group the administration of Mumbai to Sameer Bhujbal)

नवाब मलिकांचं नाव होतं चर्चेत

राष्ट्रवादीच्या मुंबई शहराध्यक्षपदी असताना नवाब मलिक यांचा कार्यकाळ चांगला चर्चेत राहिला होता. त्यामुळं त्यांच्या नावाची वर्णी अजित पवार गटाकडून अपेक्षित असल्याचं बोललं जात होतं. मात्र, मलिकांना प्रसार माध्यमांशी बोलण्यास न्यायालयानं बंदी घातल्यामुळं नवाब मलिक यांचं नाव मागे पडले आहे. शिवाजीराव नलावडे यांच्या नावालाही पक्षातून अनेक जणांनी विरोध दर्शवल्यामुळे समीर भुजबळ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यावर बुधवारी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

कोण आहेत समीर भुजबळ?

समीर भुजबळ हे राष्ट्रवादीचे खंदे समर्थक आणि अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे आहेत. तर पंकज भुजबळ यांचे चुलत भाऊ आहेत. समीर भुजबळ यांचा जन्म नाशिकमध्ये 9 ऑक्टोबर 1973 साली झाला. समीर भुजबळ यांनी आपलं शिक्षण मुंबईतून पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये सक्रिय सहभाग घेतला. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून समीर भुजबळ यांच्यासोबत कायम आपल्याला पाहायला मिळाले. समीर भुजबळ हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर नाशिक मतदारसंघातून 2009 साली खासदार म्हणून निवडून आले होते.

छगन भुजबळांकडून कौतुक

छगन भुजबळ आणि समीर भुजबळ राष्ट्रवादीच्या कायमच केंद्रस्थानी राहिले आहेत. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर अजित पवार गटाचा पहिला मेळावा झाला होता. त्यावेळी मंत्री छगन भुजबळ यांचं कौतुक केलं होतं. तेव्हापासूनच समीर भुजबळांवर अजित पवार गटाची मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत होते.

- Advertisement -

(हेही वाचा: सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार निवडणूक लढवण्याबाबत संजय राऊतांचे मोठे विधान )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -