घरताज्या घडामोडीकोल्हापूरमध्ये राजकीय खळबळ; राजू शेट्टींना राष्ट्रवादीची ऑफर!

कोल्हापूरमध्ये राजकीय खळबळ; राजू शेट्टींना राष्ट्रवादीची ऑफर!

Subscribe

एकीकडे राज्यात कोरोनाचं संकट आ वासून उभं असताना दुसरीकडे राजकीय घडामोडी मात्र वेगाने घडत आहेत. ६ जून रोजी विधानपरिषदेतल्या राज्यपाल नियुक्त १२ जागा रिक्त झाल्यानंतर त्या जागांवर नव्या सदस्यांच्या नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या तिनही पक्षांमध्ये या जागांसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनाच विधानपरिषदेवर पाठवण्याची ऑफर दिल्याने राज्यपाल नियुक्त जागा असल्या, तरी या नियुक्तीवर चर्चा सुरू झाली आहे. एबीपी माझाने यासंदर्भातलं वृत्त दिलं असून त्यावर राजू शेट्टींनी प्राथमिक चर्चा सुरू असल्याचं देखील सांगितल्याचं म्हटलं आहे.

आधी भाजप, आता राष्ट्रवादी?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: जयंत पाटील यांना राजू शेट्टींची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पाठवल्याची माहिती मिळत आहे. या भेटीमध्ये प्राथमिक कारण जरी राजू शेट्टींच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस करण्याचे असले, तरी तिथे राजू शेट्टींना देण्यात आलेल्या ऑफरविषयी चर्चा झाल्याची माहिती आहे. याआधी राजू शेट्टी यांच्यासोबत असलेल्या सदाभाऊ खोत यांना भाजपने त्यांच्या कोट्यातून विधान परिषदेची जागा दिली होती. आता तशाच प्रकारची ऑफर राजू शेट्टींना देखील देण्यात आली असल्यामुळे आता याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. याआधी राजू शेट्टी भाजपसोबत होते. मात्र, भाजपशी मंत्रिपदावरून आणि अपेक्षित जागांवरून वाजल्यानंतर त्यांनी भाजपशी फारकत घेतली. मधल्या काळात राजू शेट्टींनी राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेसाठी देखील सकारात्मक भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टींना राष्ट्रवादी काँग्रेसकडून अशी ऑफर मिळणं महत्त्वाचं मानलं जात आहे.

- Advertisement -

दरम्यान, याविषयी राजू शेट्टींनी सध्या मौनच बाळगणं पसंत केलं आहे. ‘सध्या प्राथमिक चर्चा सुरू झाली असून यापुढे देखील यावर चर्चा सुरू राहील’, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या ऑफरवर राजू शेट्टी सकारात्मक भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -