घरमहाराष्ट्रभाकरी फिरवण्याचे संकेत होते, पण... शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राऊतांनी केलेले ट्वीट...

भाकरी फिरवण्याचे संकेत होते, पण… शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राऊतांनी केलेले ट्वीट चर्चेत

Subscribe

संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटले की, भाकरी फिरवण्याचे संकेत होते, पण तवाच फिरवला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली असून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्ती घेत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या घोषणेनंतर उपस्थित कार्यकर्त्यांकडून पवारांच्या निर्णयाला तीव्र विरोध होत आहे. तर राजकीय वर्तळातूनही अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही एक ट्वीट केले आहे. संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटले की, भाकरी फिरवण्याचे संकेत होते, पण तवाच फिरवला. ( NCP President Sharad Pawar announcement of Retirement Sanjay Raut Tweeted on Retirement  )

- Advertisement -

( हेही वाचा: पवारसाहेब राजीनाम्यावर ठाम, नव्या अध्यक्षाला साथ देऊ : अजित पवार )

काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याची वेळ आल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. आता शरद पवारांनी अध्यक्ष पदावरुन केलेल्या घोषणेनंतर राऊत यांनी ट्वीट करत भाकरी फिरवण्याचे संकेत होते पण तवाच फिरवला, असं राऊत यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.

- Advertisement -

राऊतांचे ट्वीट काय?

एक वेळ अशी आली. घाणेरडे आरोप प्रत्यारोप राजकारण याचा उबग येऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. शरद पवार यांनी तेच केले आहे. जनतेच्या रेट्यामुळे बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला. शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.

निवृत्तीची घोषणा मागे घ्यावी यासाठी कार्यकर्त्यांकडून पवारांना विनंती

शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा मागे घ्यावी यासाठी कार्यकर्त्यांकडून पवारांना विनंती केली जात आहे. सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर गर्दी केली आहे. तसेच, शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी विनंती करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -