घरमहाराष्ट्रआधीचे निर्णय रद्द करणे चुकीचे - शरद पवार

आधीचे निर्णय रद्द करणे चुकीचे – शरद पवार

Subscribe

राज्यात नवे सरकार स्थापन होऊन दोन आठवडे झाले आहेत, परंतु दोनच मंत्री काम करीत आहेत. विविध जिल्ह्यांत पूरस्थिती असूनही प्रशासन पूर्णपणे ठप्प आहे. राज्यातील जनतेच्या दृष्टीने हे अतिशय नुकसानदायक आहे. या सरकारने काही नवीन केले असते तर नक्कीच त्यांचे अभिनंदन केले असते, परंतु आधीचे निर्णय रद्द करणे आणि आपण मोठे काहीतरी केले आहे हे दाखवणे चुकीचे आहे, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला.

नागपूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केल्यानंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना नामांतराच्या मुद्द्यावर प्रश्न विचारला असता पवार म्हणाले की, आधीचे निर्णय रद्द करणे हा पूर्णपणे राज्य सरकारच्या अखत्यारितील विषय आहे, परंतु त्यामागे योग्य कारण असणे गरजेचे आहे. नामांतराच्या विषयाला स्थगिती देण्यामागे काय कारण आहे यासंबंधी राज्य सरकारलाच विचारावे लागेल. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री नसून देवेंद्र फडणवीस हेच खरे मुख्यमंत्री असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यावर संजय राऊत यांनी दोघांसोबतही काम केलेले असल्याने त्यांना कुणाची काय कुवत आहे हे चांगलेच माहीत असल्याचे शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

समज असणार्‍यालाच महत्त्व द्यावे
पवारांनी शिवसेना तीनदा फोडली हेआमदार दीपक केसरकर यांचे वक्तव्य फारसे महत्त्व द्यावे असे नाही. ज्याला राजकारणाची समज आहे त्यालाच महत्त्व द्यावे, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -