घरमहाराष्ट्रशरद पवारांची चौफेर फटकेबाजी; शिंदे, राऊतांसह पृथ्वीराज चव्हाणांचाही घेतला समाचार

शरद पवारांची चौफेर फटकेबाजी; शिंदे, राऊतांसह पृथ्वीराज चव्हाणांचाही घेतला समाचार

Subscribe

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेत, चौफेर फटकेबाजी केली आहे. पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपचा आदेश मान्य करावाच लागतो, असं म्हणत टोला लगावला आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेत, चौफेर फटकेबाजी केली आहे. पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपचा आदेश मान्य करावाच लागतो, असं म्हणत टोला लगावला आहे. ( NCP president Sharad pawar criticised Eknath Shinde Sanjay raut and Prithviraj chavan in Satara’s PC )

एकनाथ शिंदेंना टोला

शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. भाजपमध्ये आदेशाची पद्धत आहे. भाजपचा आलेला आदेश एकनाथ शिंदे यांना मान्य करावा लागतो, असं शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही शरद पवार यांनी टोला लगावला आहे. पृथ्वीराज चव्हाम यांची त्यांच्या पक्षात काय परिस्थिती आहे. हे त्यांच्या पक्षातील नेत्यांना विचारले तर ते खासगीत सांगतो असं म्हणतील, असं पवार म्हणाले.

राऊतांच्या लिखाणाकडे दुर्लक्ष करतो

1999 साली राष्ट्रवादी पक्ष सत्ते आला. त्यावेळी मी ज्यांना क‌ॅबिनेट मंत्री पदावर संधी दिली त्या आमदारांना याआधी कधीच सत्तेत पद मिळाले नव्हते. मी स्वत: राज्यमंत्रीपदापासून राजकारणात सुरुवात केली आहे. पण मी अनेकांना डायरेक्ट कॅबिनेट मंत्री केले. तुम्ही लिहले यांचे आमच्या मते काही महत्त्व नाही. राज्यात सत्तेत आलो, तेव्हा नव्या मंत्रिमंडळात सहभागी केले त्यांना पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री केले होते. आम्ही तयार करतो की नाही ही कुणी लिहले हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही, त्यांचा लिहिण्याचा अधिकार आहे. आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो, असं म्हणत शरद पवरांनी सामना अग्रलेखाला प्रत्युत्तर दिलं आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: मुंबईत भ्रष्टाचाराच्या आरोपावर श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर पलटवार; म्हणाले, कंत्राटदाराची भाषा… )

बावनकुळेंना उत्तर

शरद पवार हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. त्यांनी तरी देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या कार्यकर्त्यांवर असं काही बोलू नये. पवरा साहेबांनी त्यांच्यावर बोलू नये असं मला वाटतं, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले होते. त्यावर आता शरद पवार म्हणाले की, जबाबदार पदांवरील व्यक्ती अशी वक्तव्य करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करावं लागेल, असं पवारांनी स्पष्ट केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -