मोठी बातमी: शरद पवारांचा राजीनाम्याचा निर्णय मागे पण…

"मी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे. मी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारत आहेत", असे शरद पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

मुंबई | “नवीन नेतृत्व घडण्यावर माझा भर असेल”, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. शरद पवारांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपद स्वीकारत असल्याचे त्यांनी आज पत्रकार परिषदेतून सांगितले.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवड समितीची आज बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवारच अध्यक्षपदी कायम राहातील, असा ठराव निवड समितीच्या बैठकीत पारित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांना दिली आहे. आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा निवड समितीने नामंजूर केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शरद पवार म्हणाले, “मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे. मी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारत आहेत. माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये काही संघटनात्मक बदल असो, नवीन जबाबदारी सोपविणे, नवीन नेतृत्व घडण्यावर माझा भर असेल. या पुढे पक्ष बांधणीसाठी तसेच पक्षाची विचारधारा आणि ध्येय धोरणे जनमाणसामध्ये रुजवण्यासाठी अधिक जोमाने काम करेल. आपण माझ्यासोबत राहतात. मी आपला कायम ऋणी राहील. आणि मी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे पुनःश्च जाहीर करतो आहे”, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शरद पवार नेमके काय म्हणाल

“‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनातील ६३ वर्षांच्या सेवेवंतर जबाबदारीतून मुक्त व्हावे ही माझी इच्छा होती. परंतु, माझ्या निर्णयानंतर जनमाणसांत तीव्र भावना उमटली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जनतेमध्ये अस्वस्था निर्माण झाली. या निर्णयाचा मी फेरविचार करावा याकरता माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते, विश्वास असणारे कार्यकर्ते असंख्य चाहते यांनी संघटित होऊन एकमुखाने, काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केले. त्याचबरोबर देशभरातून  विशेषत: महाराष्ट्रातून इतर सहकारी पक्षातील नेते, कार्यकर्ते यांनी मी ही जबाबदारी पुन्हा घ्यावी अशी विनंती केली. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेल्या आवाहने व विनंतीचा विचार करून. तसेच पक्षात घटीत केलेल्या समितीने मी पुन्हा अध्यक्षपदी रहावे. या निर्णयाचा देखील मान राहून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे.”