Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र शरद पवार दीड महिन्यात तिसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर, अर्धातास खलबतं

शरद पवार दीड महिन्यात तिसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर, अर्धातास खलबतं

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार दीड महिन्यात तिसऱ्यांदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. पवार-ठाकरे यांची दीड महिन्यात तिसऱ्यांदा भेट झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे. नेमकं कोणत्या विषयावर चर्चा झाली यासंबंधी माहिती अद्याप समोर आलेली नाही.

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथिगृहावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांनी कृषी संदर्भातील विविध मुद्यांचा आढावा घेतला. या बैठकीला राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संदीपान भुमरे उपस्थित होते. या भेटीनंतर शरद पवार मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर गेले.

या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता

- Advertisement -

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वबळाचा नारा देत आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि सरकारचं काय? अशा अनुषंगाने चर्चा होऊ शकते. दुसरा मुद्दा म्हणजे गेले काही दिवस केंद्रीय तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. त्यांना कशा पद्धतीने उत्तर देता येईल यासंबंधी चर्चा होऊ शकते. मराठा आरक्षण, आबोसी आरक्षणाचा मुद्दा गाजतोय, या संदर्भात देखील चर्चा झाली असावी.

संसदेच्या आगामी अधिवेशनावर चर्चा

येत्या १९ जुलैपासून संसदेचं अधिवेशन सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना-राष्ट्रवादीची भूमिका आणि मुद्दे असावे यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही बैठकीत चर्चा होऊ शकते.

- Advertisement -

 

- Advertisement -