घरमहाराष्ट्रसाहेब यांचं ऐकू नका, तुमचा निर्णय योग्यच; प्रतिभा पवार यांचा पतीच्या निर्णयाला...

साहेब यांचं ऐकू नका, तुमचा निर्णय योग्यच; प्रतिभा पवार यांचा पतीच्या निर्णयाला पाठिंबा

Subscribe

शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी तुमचा निर्णय योग्यच असल्याचं सांगत शरद पवार यांच्या मागे उभ्या राहिल्या. तुम्ही निर्णय मागे घेऊ नका, असं पवारांच्या कानात सांगत राहिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन पायऊतार होण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली. शरद पवारांनी हा निर्णय मागे घ्यावा म्हणून अनेक ठिकाणी आंदोलने, घोषणाबाजी सुरु झाली आहे. तसचं, शरद पवार यांनी हा निर्णय घेतल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी तसचं, नेत्यांनी हा निर्णय मागे घेण्यासाठी भावूक भाषणं करत विनंती केली. परंतु शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी तुमचा निर्णय योग्यच असल्याचं सांगत शरद पवार यांच्या मागे उभ्या राहिल्या. तुम्ही निर्णय मागे घेऊ नका, असं पवारांच्या कानात सांगत राहिल्या. ( NCP President Sharad Pawars Wife Pratibha Pawar Stood stick by Sharad pawars Decision )

नेमकं काय म्हणाल्या प्रतिभा पवार

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर वाय बी चव्हाण सेंटरमध्ये अभूतपूर्व गोंधळ झाला. कार्यकर्ते घोषणा देऊ लागले, नेते समजावू लागले. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल वगळता सगळ्या नेत्यांनी आपण निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली.

- Advertisement -

यादरम्यान, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ यांनी अतिशय भावूक भाषणे केली. आपण आम्हाला घडवलंत, आता तुम्हीच राजकारणात नाही म्हटल्यावर आम्ही कुठे जायचं, अशी याचना नेते करु लागले. हे सगळं घडत असताना प्रतिभा पवार या शरद पवार यांच्या खुर्चीला खुर्ची लावून शेजारी बसून होत्या.

( हेही वाचा: ‘मोठे नेते तोंड दाखवायच्या लायकीचे’, कंबोजांचा इशारा; ‘लवकरच मोठा खुलासा…’ )

- Advertisement -

आपला निर्णय योग्यच आहे. हा निर्णय घ्यावाच लागणार होता. तु्म्ही आपल्या निर्णयावर ठाम राहा, कार्यकर्ते नेत्यांच्या मागणीवर निर्णय मागे घेऊ नका, असं प्रतिभा पवार म्हणाल्या. कार्यकर्ते रडत होते. पण प्रतिभा पवार या शरद पवार यांना स्मितहास्याने साथ देत होत्या. त्यामुळए शेवटपर्यंत शरद पवार यांनी नेते कार्यकर्त्यांचे न ऐकता आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

माझा निर्णय झालाय, सक्रीय राजकारणातून जरी बाजूला जाणार असलो तरी पक्षापासून बाजूला जाणार नाही, लोकांपासून वेगळं राहणार नाही, असा शब्द भावूक कार्यकर्त्यांना देत शरद पवार सिल्व्हर ओककडे रवाना झाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -