राष्ट्रवादीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

भंडारा शहरातील मुख्य रस्त्यांचे काम मागील काही दिवसांपासून बंद असल्याने आणि याचा त्रास नागरिकांना होत असल्याने नवनिर्माणाधीन रस्त्यांचे काम लवकरात लवकर सुरु करून पूर्ण करण्यात यावे या मागणीसाठी आज राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

protest
प्रातिनिधक फोटो

भंडारा नगर परिषद आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या विवादामुळे भंडारा शहरातील मुख्य रस्त्यांचे काम मागील १५ दिवसांपासून बंद असल्याने आणि याचा त्रास नागरिकांना होत असल्याने नवनिर्माणाधीन रस्त्यांचे काम लवकरात लवकर सुरु करून पूर्ण करण्यात यावे या मागणीसाठी आज राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या राष्ट्रीय महामार्गाचे रस्ता निर्मितीचे कार्य मागील तीन महिन्यापासून भंडारा शहरात खात रोडवर सुरू असुन हे काम पूर्ण होण्या अगोदरच कंत्राटदाराने जिल्हा परिषद चौकातून रस्त्याच्या मधून एका बाजूने जवळपास एक फूट खोदकाम केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले पत्र

५०० मीटर पर्यंत हे खोदकाम गेल्यानंतर नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी राष्ट्रीय महामार्ग तसेच भंडारा जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून हे काम त्वरित थांबवण्यास पत्र लिहिले, काम सुरु करण्याबद्दल नगरपरिषदेने नाहरकत प्रमाणपत्र दिला नाही आणि कामाचे नियोजन विषय कोणती चर्चा केली नसल्याने हे काम थांबवून या विषयावर चर्चा करून त्यानंतरचे काम सुरू करावे असे या पत्राद्वारे कळविण्यात आले. मात्र या बाबीला आता तब्बल १५ दिवस उलटून गेले असल्याने ही यावर कोणताही तोडगा निघाला नसल्याने अर्धवट खोदलेल्या रस्त्यावर दुतर्फा वाहतूक केवळ अर्धवट असलेल्या रस्त्यावर सुरू असल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत अाहे. कधीही अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे आणि भंडारा शहरात मागील तीन महिन्यापासून काम सुरू असतानाही नगराध्यक्षांना नियोजनाबाबत का सूचले नाही आणि आत्ताच जिल्हा परिषद चौकात काम सुरू होतात ना हरकत प्रमाणपत्राच्या नावाखाली हे काम बंद करणे,न पटणाऱ्या कारण असल्याने आज भंडारा शहर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने खात रोड ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना नवनिर्माणाधीन रस्त्यांचे काम लवकर सुरु करून १५ दिवसात पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इसारा राष्ट्रवादीतर्फे देण्यात आला आहे.