उद्धवजी के सन्मान मे राष्ट्रवादी मैदान मे, निफाड तालुक्यातील चांदोरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने लावले होर्डिंग

NCP puts up banner in support of Uddhav Thackeray in Niphad, Nashik district

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. 7 दिवसांपासून शिंदे जवळपास 40 आमदारांना घेऊन गुवाहटीमध्ये दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदेंच्या विरोधात राज्यात अनेक ठिकाणी शिवसैनिकांकडून आंदोलन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेताल आहे. नाशिख जिल्ह्यातील निफाड तालुक्यात चांदोरीमध्ये उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थन होर्डिंग लावण्यात आली आहेत.

काय आहे होर्डींगवर –

शिवसेनेतील बंडाळीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या बाजून उभी राहिली आहे. निफाड तालुक्यातील चांदोरीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी होर्डिंग लावण्यात आले आहेत. यावर उद्धवजी के सन्मान मे राष्ट्रवादी मैदान मे ‘, असे लिहीले आहे. नाशिक-औरंगाबाद रोडवर लावण्यात आलेलं होर्डिंग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. निफाड तालुक्यात कायमच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षात राजकीय संघर्ष बघायला मिळाला आहे. मात्र, सध्याच्या अस्थिर वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शविणारे होर्डिंग लावले आहे. यामुळे सत्ता संघर्षाचे लोण ग्रामीण भागातही पोहोचल्याचे दिसत आहे.

बंडखोर एकनाथ शिंदे गट सर्वोच्च न्यायालया –

शिवसेनेने एकनाथ शिंदे तसेच ४० बंडखोर आमदारांना खिंडीत गाठण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब सुरु केला आहे. शिवसेनेने शिंदे गटातील १६ बंडखोर आमदाराचे विधिमंडळ सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी केली असून त्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांना पक्षाचे कोणतेही निर्णय घेता येऊ नयेत म्हणून त्यांना गटनेते पदावरुन बाजूला सारून हे पद अजय चौधरी यांना देण्यात आले आहे. शिवसेनेच्या या निर्णयानंतर आता एकनाथ शिंदे यांनीही आक्रमक पवित्रा धारण केला असून शिवसेनेच्या या दोन्ही निर्णयांवर आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून हे निर्णय रद्द करावेत अशी मागणी केली आहे. आज १०.३० वाजता या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.