घरताज्या घडामोडीबंगालमधील पराभवाचा राग पेट्रोल डिझेल का काढताय? राष्ट्रवादीचा केंद्र सरकारला सवाल

बंगालमधील पराभवाचा राग पेट्रोल डिझेल का काढताय? राष्ट्रवादीचा केंद्र सरकारला सवाल

Subscribe

दर महिन्याला भारतात निवडणुका असत्या तर किती बरं झालं असतं.

देशात मगील महिन्यात पेट्रोल डिझेलच्या दराचा वाढता आलेख पाहायला मिळत होता. परंतु देशातील पाच राज्यांच्या निवडणूकींची घोषणा झाली आणि इंधन दरवाढीचा आलेख मंदावला होता. आता या ५ राज्यांतील निवडणूकींचा धुरळा खाली बसताच पुन्हा इंधरवाढीच्या आलेख वाढताना दिसत आहे. त्यामुळे दर महिन्याला भारतात निवडणुका असत्या तर किती बरं झालं असते त्यामुळे निदान राज्यातील पेट्रोल डिझेलचे भाव तरी स्थिर राहिले असते असा टोला राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. पाच राज्यांचा निकाल लागल्यापासुन सलग चौथ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.

देशातील पाच राज्यांतील निवडणूका झाल्यानंतर सगल चौथ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात तेजीने वाढ होत आहे. शुक्रवारी मुंबईत २७ पैशांनी पेट्रोलचा भाव वाढल्याने सध्याचा भाव ९७.६१ रुपयांवर पोहोचला आहे. तसेच डिझेलच्या भावात ३३ पैशांची वाढ झाली आहे. आता डिझेलचा दर ८८.८२ रुपयांवर गेला आहे. त्यामुळे या वाढत्या दरांवरुन राष्ट्रवादी काँग्रेसने थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बंगालमधील पराभवाचा राग पेट्रोल डिझेल का काढताय? असा सावाल केंद्र सरकारला केला आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे की, दर महिन्याला भारतात निवडणुका असत्या तर किती बरं झालं असतं. काही नाही निदान पेट्रोल डिझेलचे भाव तरी स्थिर राहिले असते. पाच राज्यांच्या निवडणुक निकालापासून आजची सलग चौथ्या दिवशी भाववाढ झाली आहे. ” सन्माननीय पंतप्रधान मोदीसाहेब, बंगाल मधील पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय?? असा सवाल त्यांनी केला आहे. रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत केंद्र सरकारला टोला लगावला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -