घरताज्या घडामोडीआधी म्हटले मी सरकारमध्ये सामील होणार नाही, आता चक्क सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री..,राष्ट्रवादी...

आधी म्हटले मी सरकारमध्ये सामील होणार नाही, आता चक्क सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री..,राष्ट्रवादी काँग्रेसचा फडणवीसांना टोला

Subscribe

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार, खातेवाटप कधी होणार अशा प्रकारच्या चर्चांना जोरदार उधाणं आलं होतं. त्यानुसार मंत्रीमंडळाचा विस्तार, खातेवाटप आणि आता पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारने काल शनिवारी संध्याकाळी पालकमंत्र्यांच्या नावांची यादी जाहीर केली. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विदर्भातील सहा जिल्ह्यांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. दरम्यान, आधी म्हटले मी सरकारमध्ये सामील होणार नाही, आता चक्क सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

…आता चक्क सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री!

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, ‘आधी म्हटले, मी सरकारमध्ये सामील होणार नाही. नंतर उपमुख्यमंत्री झाले. नंतर गृहमंत्रीपदासह ८ ते ९ खात्यांचे मंत्री झाले आणि आता चक्क सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री! मी सरकारमध्ये सामील होणार नाही’, अशा शब्दांत रविकांत वरपे यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे.

- Advertisement -

संजय शिरसाट, बच्चू कडूंना खोचक शुभेच्छा

संजय शिरसाट यांची गुवाहाटी जिल्ह्याच्या, तर बच्चू कडू यांची सुरत जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल
खुप खुप अभिनंदन…५० खोके! एकदम ओके!, असं रविकांत वरपे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यातील पालकमंत्र्यांची यादी काल संध्याकाळी जाहीर केली. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तर एक नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी सोपावण्यात आली आहे.


हेही वाचा : औरंगाबादमधील PFI संघटनेचे कार्यालय फोडण्याचा मनसेसैनिकांकडून प्रयत्न; ‘ही कीड समूळ नष्टच करा…’, राज ठाकरेंचे


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -