घरताज्या घडामोडीभाजप विरोधात लढायचे असेल तर .... रोहित पवारांनी भाजपवर निशाणा

भाजप विरोधात लढायचे असेल तर …. रोहित पवारांनी भाजपवर निशाणा

Subscribe

महाराष्ट्रात केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने दबावतंत्राचे राजकारण करुन उत्तर प्रदेशातील उर्वरित टप्प्यातील निवडणूका आणि आगामी पालिकेच्या निवडणूकीसाठी आधी रान उठवायचे, बदनामी करायची आणि आपले नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत असावा.

Rohit Pawar :  राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारचे सर्व नेत्यांनी मलिकांच्या समर्थनार्थ मंत्रालयाजवळ असलेल्या माहात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ  आंदोलन केले. त्याचप्रमाणे केंद्र सरकार विरोधात मविका आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला.भाजपच्या विरोधात लढायचे असेल तर सत्याच्या मार्गाबरोबर आक्रमकतेच्या मार्गाही अवलंबवावा लागेल, असे रोहित पवार यांनी म्हटले.

‘राज्यघटनेने दिलेला आवाज उठवण्याचा हक्क चिरडायचे प्रयत्न कपटी शत्रू करत असेल तर त्याविरोधात गांधीजींच्या सत्याच्या मार्गाने त्याचप्रमाणे भगतसिंह, राजगुरू यांच्या आक्रमकेच्या मार्गानेही लढावे लागेल’, असा सल्ला देत रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला.

- Advertisement -

पुढे ते म्हणाले, महाराष्ट्रात केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने दबावतंत्राचे राजकारण करुन उत्तर प्रदेशातील उर्वरित टप्प्यातील निवडणूका आणि आगामी पालिकेच्या निवडणूकीसाठी आधी रान उठवायचे, बदनामी करायची आणि आपले नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत असावा. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करुन संविधानाने दिलेला आवाज उठवण्याचा हक्क चिरडायचा. अशा कपटी आणि क्रूर लोकांच्या विरोधात गांधीजींच्या सत्याच्या मार्गाने आणि भगतसिंह, राजगुरू यांच्या आक्रमकेच्या मार्गानेही लढावे लागेल लागेल.


हेही वाचा – भ्रष्टाचाराविरोधातील लढाई सुरू झालीय आणि यात जनताच जिंकेल, आशिष शेलारांचा मविआवर निशाणा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -