शिंदे गटातील खासदारावर लैंगिक शोषणाचा आरोप; पण राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप

ncp rupali thombre and rupali chakankar argument on rahul shewale was accused of exploiting a woman

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला आहे. ज्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र या प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप- प्रत्यारोपांचा डाव सुरु झाला आहे. राहुल शेवाळेंवर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या पीडितेचा चेहरा उघड केल्याप्रकरणी रुपाली ठोंबर यांच्यावर आता कारवाई होण्याची शक्यता आहे. कारण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीच हा इशारा दिला आहे.

खासदार राहुल शेवाळे यांच्यावर आरोप करणाऱ्या पीडितेचा चेहरा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उघड केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर राज्य महिला आयोग कारवाई केली जाईल. विशेष म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे पाटील या दोघीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या आहेत. मात्र रुपाली ठोंबरे पाटील यांनी मी कायद्याचं उल्लंघन केलं नाही, त्यामुळे महिला आयोग माझ्याविरोधात कारवाई करु शकत नाही, असं स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान रुपाली ठोंबरे पाटील यांनी या प्रकरणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून राहुळ शेवाळेंविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच याप्रकरणाचे पुरावेही मुख्यमंत्र्यांकडे सोपवले आहेत.

या प्रकरणी पीडितेला संरक्षण देण्याची मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे. पीडितेच्या न्यायासाठी महिला आयोगाने वारंवार पोलीस महासंचालकांना पत्र पाठवून देखील पीडितेची साधी तक्रार पोलीस ठाण्यामध्ये नोंदवून न घेतली जाणे ही बाब चिंताजनक असल्याचे चाकणकर यांनी म्हटले आहे. मात्र पीडित महिला आता मुंबईत येईल आणि गुन्हा दाखल करेल असा दावाही राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी केला आहे. दरम्यान राहुल शेवाळेंवर आरोप करणाऱ्या महिलेच्या जीवाला धोका असून तिला मुख्यमंत्र्यांनी संरक्षण देण्याची मागणी रुपाली पाटील यांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी रुपाली ठोंबर पाटील यांनी राहुल शेवाळेंवर आरोप करणाऱ्या महिलेला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जगासमोर आणले. मात्र पीडितेची ओळख सार्वजनिक करणे गुन्हा असल्याचे म्हणत रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी संबंधितांना पोलीस महासंचालकांच्या मार्फत पत्र पाठवून योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती दिली आहे.

शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका फॅशन डिझायनरने लैंगिक शोषणाचा आरोप केला, हे प्रकरण ठाकरे गटानेही उचलून धरले, ज्याचे पडसाद आता विधिमंडळातही उमटले. राहुल शेवाळे यांचे संबंधित महिलेसोबतचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. ज्यानंतर यानंतर राहुल शेवाळी यांनी पत्रकाप परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. फेक अकाऊंटच्या माध्यमातून महिलेने मला ब्लॅकमेल केल्याचा दावा करत राहुल शेवाळेंनी सर्व आरोप फेटाळले. तसेच माझ्यावर आरोप करणारी महिला दोन वेळा कराचीला जाऊन आली असून तिचे दाऊद आणि पाकिस्तानशी संबध आहेत. तसेच तिने पाकिस्तानी एजंटच्या मदतीने फेक अकाऊंट सुरू केलेत, त्यामुळे महिलेला गुन्हेगारी पार्श्वभूमी असून तिच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीराहुल शेवाळे यांनीच केली आहे.


लोकपाल कायद्यासारखं लोकायुक्त विधेयक मंजूर करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य, फडणवीसांकडून आभार