मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – शरद पवार येणार एकाच मंचावर; पुण्यातील ‘त्या’ कार्यक्रमास लावणार हजेरी

ncp sharad pawar cm eknath-shinde together on the same platform on the occasion of annual general meeting of vasantdada sugar institute

राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार आहेत. पुण्यातील मांजरी येथे आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 46 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडतेय. ही सभा सकाळी 11 वाजता होणार असून याचं सभेनिमित्त दोन्ही दिग्गज नेते एकत्र येणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागून आहे,

माजी केंद्रीय कृषी मंत्री, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत. या इन्स्टिट्यूट 46 वी सर्वसाधारण सभा आज मांजरी येथील कार्यालयात पार पडणार आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी शरद पवार असणार आहेत. यासभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. यावेळी 2021-2022 या वर्षासाठी सर्वोत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे. आजच्या या सभेसाठी सहकारमंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अजित पवार, संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासह संस्थेचे विश्वस्त आणि नियामक मंडळाचे सदस्य, अधिकारी, आणि राज्याच्या साखर उद्योगातील अन्य नेते देखील हजेरी लावणार आहेत. यावेळी इन्स्टिट्यूटतर्फे 2021-2022 या वर्षासाठी विविध पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे.

राज्याच्या साखर उद्योगात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही मध्यवर्ती संस्था म्हणून काम करते. या संस्थेमार्फत ऊसाच्या संदर्भात विविध संशोधन, मार्गदर्शन केलं जातं. वसंतदादा पाटील यांनी डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटची स्थापना करुन संशोधनाला चालना दिली. याच संस्थेचे नाव आज वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट आहे. आज राज्यात छोट्या-मोठ्या सहकारी पतसंस्थांचे जाळे उभे राहिलेले दिसते, त्यामागे वसंतदादांचा मोठा हातभार आहे.


गांभीर्य नसल्याने अपघात रोखणे कठीणच!