बाळासाहेबांप्रमाणेच शरद पवारांनी निर्णय घेतला; निवृत्तीच्या घोषणेवर राऊतांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी  राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे. अध्यक्ष पदावरून निवृत्त होत असलो तरी, माझी निवृत्ती सार्वजनिक क्षेत्रातील नाही. शिवाय, राज्यसभा सदस्यत्वाची तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचेही शरद पवारांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी  राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे. अध्यक्ष पदावरून निवृत्त होत असलो तरी, माझी निवृत्ती सार्वजनिक क्षेत्रातील नाही. शिवाय, राज्यसभा सदस्यत्वाची तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचेही शरद पवारांनी यावेळी सांगितले. मात्र शरद पवारांच्या या निर्णयानंतर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया देत शरद पवारांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. (NCP Sharad Pawar decision like balasaheb thackeray says mp sanjay raut on twitter)

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेवर प्रतिक्रिया दिली. “एक वेळ अशी आली. घाणेरडे आरोप प्रत्यारोप राजकारण याचा उबग येऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. शरद पवार यांनी तेच केले आहे. जनतेच्या रेट्यामुळे बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला. शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत”, असे संजय राऊत यांनी म्हटले.

शरद पवारांच्या या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याची घोषणाही यावेळी शरद पवार यांनी केली.

‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या पुर्नप्रकाशनाच्या कार्यक्रमात संबोधित करताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेतो अशी घोषणा केली. तसेच, पुढील अध्यक्षाचा निर्णय निवड समिती मार्फत करावी असेही शरद पवार यांनी सांगितले. मात्र शरद पवारांच्या या निवृत्तीच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विरोध केला.

निवृत्तीची घोषणा मागे घ्यावी यासाठी कार्यकर्त्यांकडून पवारांना विनंती

शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा मागे घ्यावी यासाठी कार्यकर्त्यांकडून पवारांना विनंती केली जात आहे. सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर गर्दी केली आहे. तसेच, शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी विनंती करत आहेत.


हेही वाचा – राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून शरद पवारांची निवृत्तीची घोषणा; कार्यकर्ते भावूक