Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र राजकारण आणि राष्ट्रवादीला तुमची गरज; केंद्रीय मंत्र्यांचं शरद पवारांच्या राजीनाम्यावर ट्वीट

राजकारण आणि राष्ट्रवादीला तुमची गरज; केंद्रीय मंत्र्यांचं शरद पवारांच्या राजीनाम्यावर ट्वीट

Subscribe

माननीय शरद पवार साहेब, आपण राजकारणातही हवेत आण‍ि राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या अध्‍यक्षपदी सुध्‍दा हवेत , असं ट्वीट राणे यांनी केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला त्यानंतर अनेक मोठ्या नेत्यांनी शरद पवारांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केली. आता केंद्रीय मंत्र्यांनीदेखील असंच मत व्यक्त केलं आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. माननीय शरद पवार साहेब, आपण राजकारणातही हवेत आण‍ि राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या अध्‍यक्षपदी सुध्‍दा हवेत , असं ट्वीट राणे यांनी केलं. शरद पवार यांनी मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात निवृत्तीची घोषणा केली आहे. या निर्णयावरुन आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत.(  NCP Sharad pawar Declared retirement on post of NCP President Narayan Rane Reaction  )

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले शरद पवार

शरद पवार म्हणाले की, 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, तेव्हापासून 24 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. सार्वजनिक जीवनातील 1 मे 19960 पासून सुरु झालेला हा संपूर्ण प्रवास गेली 63 वर्षे अविरत सुरु आहे. यातील 56 वर्षे मी कुठल्या सभागृहात सदस्य म्हणून काम केलं आहे. राज्यसभेची पुढची तीन वर्षे राहिली आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या अधिकाधिक प्रश्नांवर लक्ष घालण्यावर माझा भर असेल, असंही शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

शरद पवार म्हणाले की, आपल्याला माहिती आहे, माझा अनेक संस्थांशी कामकाजामध्ये सहभाग आहे. रयत शिक्षण संस्था, विद्या प्रतिष्ठान, मराठा मंदीर मुंबई, महात्मा गांधी सर्वोदय संघ, अशा अनेक संस्थांच्या कामकाजामध्ये माझा सहभाग आहे, या कार्यांवर मी अधिक भर देणार आहे, असंही शरद पवार म्हणाले.

( हेही वाचा: … म्हणून आपला हा निर्णय न पटणारा, सुषमा अंधारेंचं शरद पवारांना भावनिक पत्र )

शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेत घोषणा केली. त्यानंतर ठाण्यातही पडसाद उमटले. ठाण्यातील कार्यकर्त्यांनी पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, यासाठी चक्क आत्मक्लेश आंदोलनाचा मार्ग अनुसरला. पक्ष कार्यालयासमोर अनेक कार्यकर्ते चक्क उपोषणाला बसले. या उपोषणात महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, शहर सरचिटणीस रवींद्र पालव, आदी सहभागी झाले होते.

- Advertisment -