घरमहाराष्ट्रSharad Pawar Group : ...हे असेल शरद पवार गटाचं नवं नाव आणि...

Sharad Pawar Group : …हे असेल शरद पवार गटाचं नवं नाव आणि चिन्ह; सूत्रांनी दिली माहिती

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह दोन्ही अजित पवार गटाचं असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने मंगळवारी दिला. यासोबतच बुधवारी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत शरद पवार (Sharad Pawar) गटाला आपल्या नव्या पक्षाचं नाव आणि चिन्हाची सूचना देण्याची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, पक्षाचे नाव आणि चिन्हाचा निकाल अजित पवार गटाकडून लागलाच तर यांची तयारी काय करायचं हे धोरणही आधीच ठरल्याची माहिती समोर येतेय.

हेही वाचा – Ladakh : लडाखचा जम्मू-कश्मीर, मणिपूर होणार नाही याची काळजी घ्यावी, ठाकरे गटाचा सल्ला

- Advertisement -

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा निकाल अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाच्या बाजूने लागल्यानंतर शरद पवार गटाने चार चिन्हांची निश्चिती केल्याची माहिती समोर येत आहे. त्यापैकी एका चिन्हाची निवड करून बुधवारी निवडणूक आयोगाला त्याची माहिती देण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, या आधी शिवसेनेचा निकाल देताना केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला पक्ष आणि चिन्ह दिलं होतं. तसाच काहीसा निर्णय राष्ट्रवादीच्या बाबतीत येऊ शकतो असा अंदाज शरद पवार आणि नेत्यांना होता. त्यामुळेच जर पक्षाचे नाव आणि चिन्हाचा निकाल अजित पवार गटाकडून लागलाच तर यांची तयारी काय करायचं हे धोरणही आधीच ठरल्याची माहिती समोर येतेय.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांचंच असल्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. निवडणूक आयोगाचा निकाल शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या निकालानंतर पक्षाचं नाव आणि चिन्ह शरद पवार गटाला वापरता येणार नाही. नवीन नाव आणि चिन्हाबाबत शरद पवार गटाला निवडणूक आयोगाला माहिती द्यावी लागणार आहे.

- Advertisement -

काय असेल नवीन नाव आणि चिन्ह?

निर्णयाचा अंदाज असल्याने शरद पवार गटाने आधीच चार चिन्ह निश्चित केल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मी राष्ट्रवादी पार्टी’ हे नाव आणि ‘उगवता सूर्य’ हे चिन्ह मिळावं अशी मागणी शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात केली जाऊ शकते. येत्या २७ फेब्रुवारी रोजी राज्यसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ३ नावे आणि ३ चिन्हे सादर करण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला केल्या आहेत. बुधवारी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ही नावे आणि चिन्ह सादर करावी लागणार आहे. दरम्यान, दिलेल्या वेळेत नाव आणि चिन्हांची यादी शरद पवार गटाने सादर न केल्यास त्यांना अपक्ष म्हणून मान्यता मिळेल. निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णयाचा परिणाम हा लवकरच होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीवर होणार असल्याचं चित्र आहे. अजित पवार गटाचा पक्षादेश मान्य करायचा की नाही असा प्रश्न आता शरद पवार गटासमोर असणार आहे.

निवडणूक आयोगाच्या निकालात काय?

निवडणूक आयोगाने अजित पवारांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे अजित पवारांनाच राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह वापरता येणार आहे. शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाली आहे.

अजित पवारांसोबत किती आमदार?

महाराष्ट्रातील 41 आमदार
नागालँडमधील 7 आमदार
झारखंड 1 आमदार
लोकसभा खासदार 2
महाराष्ट्र विधानपरिषद 5
राज्यसभा 1

शरद पवारांसोबत किती आमदार?

महाराष्ट्रातील आमदार 15
केरळमधील आमदार 1
लोकसभा खासदार 4
महाराष्ट्र विधानपरिषद 4
राज्यसभा – 3

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -