‘निवृत्त पदाधिकारी होतात, जनतेच्या मनातील राजे…’, पुण्यात पवारसमर्थकांची बॅनरबाजी

मंगळवारी शरद पवारांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीचं प्रकाशन करण्यात आले. मात्र पुस्तक प्रकाशनानंतर शरद पवार यांनी कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली. पवारांच्या घोषणेनंतर संपूर्ण सभागृहात गोंधळ झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीचं प्रकाशन करण्यात आले. शरद पवारांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेतेमंडळी उपस्थित होते. एकीकडे शरद पवारांचे आत्मचरित्र सांगणारे पुस्तक प्रकाशित होत असताना सर्वांचा चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण होते. पण काही क्षणातच स्वत: पवारांनी त्यांच्या नेत्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पळवला. त्याच कारण म्हणजे या कार्यक्रमात त्यांनी केलेली निवृत्तीची घोषणा.. (ncp sharad pawar retirement banners asking sharad pawar to withdraw his retirement decision banners in pune)

मंगळवारी शरद पवारांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीचं प्रकाशन करण्यात आले. मात्र पुस्तक प्रकाशनानंतर शरद पवार यांनी कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली. पवारांच्या घोषणेनंतर संपूर्ण सभागृहात गोंधळ झाला. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला. तेव्हापासूनच राज्यभरात कार्यकर्त्यांनी आंदोलन करत पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली. अशातच पुण्यातील कार्यकर्त्यांनी पोस्टर्स झळकावत निवृत्ती मागे घेण्याची मागणी केली आहे.

पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून शरद पवारांना निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती बॅनरमार्फत केली आहे. “साहेब निवृत्त पदाधिकारी होत असतात जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जनतेच्या मनातील राजे नव्हे”, असा मजकूर पोस्टर्सवर लिहिण्यात आला आहे. शिवाय, “केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अवघ्या देशाला आपल्या नेतृत्वाची गरज आहे साहेब, कृपया आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा” अशा मजकुराचे बॅनर्स पुण्यात झळकावण्यात आले आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष समीर उत्तरकर यांनी बॅनर्स लावले आहेत.


हेही वाचा –