Homeताज्या घडामोडीEknath Khadse : मंत्रिमंडळ विस्ताराला उशिर होण्याचे कारण; एकनाथ खडसे म्हणाले, गृहमंत्री...

Eknath Khadse : मंत्रिमंडळ विस्ताराला उशिर होण्याचे कारण; एकनाथ खडसे म्हणाले, गृहमंत्री…

Subscribe

जळगाव – महाराष्ट्रात महायुतीचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊन आता आठवडा होत आला आहे, मात्र मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कालपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत. तर दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईतच आहेत. त्यामुळे या सरकारमध्ये अजुनही सर्वकाही आलबेल नाही, हे उघड होत असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराला उशिर होत असल्यावरुन तिन्ही नेत्यांना डिवचलं. गृहमंत्री पद कोणाकडे ठेवयाचं हे ठरत नसल्यामुळे उशिर होत असल्याचा टोला त्यांनी लगावला. खडसे एबीपी माझा वृत्तवाहिनीसोबत बोलत होते.

मंत्रिमंडळ विस्तार रखडण्याचे कारण…

मंत्रिमंडळ विस्तार हा तिन्ही नेत्यांच्या अविश्वसामुळे रखडल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला. ते म्हणाले, महायुतीला विक्रमी बुहमत मिळाले. त्यानंतरही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला उशिर झाला. आता देखील मंत्रिमंडळ विस्ताराला यांना मुहूर्त मिळत नाही. कोणाला जास्त मंत्रिपद मिळतात यावरुनच यांच्यात एकमत झालेले नसणार, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याचं खडसे म्हणाले. ज्यांचे जास्त आमदार त्यांना जास्त मंत्रिपदं हे स्वाभाविक आहे, असंही एकनाथ खडसे म्हणाले.

कायदा सुव्यवस्थेवरुन खडसेंचा निशाणा

शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते खडसे म्हणाले की, राज्यात कायदा – सुव्यवस्था ढासळली आहे. दिवसाढवळ्या लोकांचे अपहरण करून खून केले जात आहेत. परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना होते आणि त्यानंतर उसलळलेला हिंसाचार या राज्याच्या स्थितीचे वर्णन करणार आहे. त्यामुळे ज्यांना कुणाला गृहमंत्रीपद द्यायचं असेल, त्यांना तत्काळ ते देऊन टाका, जेणेकरून राज्यातील कायदा सुव्यवस्था सुधारण्यास मदत होईल, असा टोला त्यांनी लगावला.

हेही वाचा : One Nation One Election: एक देश एक निवडणूक विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी; काय आहे या विधेयकात

Edited by – Unmesh Khandale