मावळ : लोणावळा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 125 कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष पदाधिकाऱ्या विश्वासात घेतले जात नाही. या कारणामुळे सर्व कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोठा धक्का मानला जातो.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विनोद होगले हे संघटना वाढवण्यासाठी चांगले काम करत होते. पण विनोद होगले यांच्या जागी नवीन अध्यक्ष नेमणूक करण्यात आला. याबाबत होगले यांना पक्षाकडून कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नाही. यामुळे राष्ट्रवादीच्या होगलेंच्यासह पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 125 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे.
हेही वाचा – Sanjay Raut : भाजपा सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रात डर्टी पॉलिटिक्स – संजय राऊत
पक्षातील वादाबाबत वरिष्ठांच्या कानावर टाकूनही दखल घेतली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आम्ही पक्षातील शिस्तप्रिय नेतृत्वाकडून योग्य ती दखल न घेतल्याने लोणावळ्यातील कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. आमच्या कामाची योग्य ती दखल घेतली जात नाही, अशी खदखद पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केली आहे.
हेही वाचा – Bangladesh Fire : एका क्षणात आग पसरली, ढाक्यात भीषण आग, आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू
या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते बाळासाहेब पायगुडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस लोणावळा शहराचे माजी अध्यक्ष विनोद होगले, मावळ तालुका चित्रपट आणि सांस्कृतिक सेलचे संतोष कचरे त्याचसोबत दत्तात्रय गोसावी, अमोल गायकवाड, रमेश दळवी, सलीम मण्यार, अजिंक्य कुंटे, सुधीर कदम, कृष्णा साबळे, तुषार पाडाळे, रवी भोईने, अँड गायत्री रिले यांच्यासह बहुतांश पदाधिकारी उपस्थित होते.