घरमहाराष्ट्रNCP Sign and Symbol: राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह जिंकल्यानंतर अजित पवार यांची...

NCP Sign and Symbol: राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह जिंकल्यानंतर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Subscribe

अजित पवार म्हणाले की, निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय मी नम्रपणे स्वीकारतो आहे.

मुंबई: राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला मिळालेलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय शरद पवार गटासाठी धक्कादायक आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे आता अजित पवार असणार आहेत. आतापर्यंत निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीअंती हा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. यावर आता उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. (NCP Sign and Symbol Ajit Pawar s first reaction after winning the NCP sign and symbol said )

अजित पवार म्हणाले की, निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय मी नम्रपणे स्वीकारतो. अगदी एका वाक्यात अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

आमचं चिन्हच शरद पवार- जितेंद्र आव्हाड

शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले, अजित पवारांना माझं आव्हान आहे की, नवीन पक्ष काढा आणि निवडणूक लढा, बघा काय होतं ते. आमचं चिन्ह काढून घेतलं असलं, तरी काही फरक पडत नाही, कारण आमचं चिन्हंच शरद पवार आहेत. फक्त वाईट एवढंच वाटतं की, शरद पवारांनी ज्यांना मोठं केलं, ते आज त्यांना दाबू पाहात आहेत. अशी प्रतिक्रिया आव्हाडांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिक्रियेनंतर खासदार सुनील तटकरे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. खासदार तटकरे म्हणाले की, आम्ही आतिशय आनंदी आहोत. निवडणूक आयोगाने हा महत्त्वाचा निर्णय देत, भारतीय लोकशाही सिद्घांतावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्याचं अंत:करणापासून स्वागत, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा आम्हाला आनंद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही ठरवलेली ध्येय, धोरणे ठरवून आम्ही काम करत आहोत. राज्यातील जनतेचा फार मोठा पाठिंबा, पाठबळ आम्हाला मिळेल, असा विश्वास मी व्यक्त करतो असं तटकरे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: Ajit Pawar Group : दादांच्या मनगटावर घड्याळ! अजित पवार गटाला मिळालं पक्ष आणि चिन्ह )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -